AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND : 3 सिक्स-6 फोर, पंतची सिडनीत टी 20 स्टाईल फिफ्टी, कपिल देव यांसह तिघांचा रेकॉर्ड ब्रेक

Rishabh Pant Fifty AUS vs IND 5th Test : टीम इंडियाच्या ऋषभ पंत याने सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात चाबूक अर्धशतक झळकावलं. पंतने यासह तिघांना मागे टाकलं आहे.

AUS vs IND : 3 सिक्स-6 फोर, पंतची सिडनीत टी 20 स्टाईल फिफ्टी, कपिल देव यांसह तिघांचा रेकॉर्ड ब्रेक
Rishabh Pant Batting aus vs ind 5th testImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Jan 04, 2025 | 12:09 PM
Share

टीम इंडियाचा विस्फोटक विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात धमाका केला आहे. पंतने सामन्यातील तिसऱ्या आणि टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात विस्फोटक खेळी करत झंझावाती अर्धशतक ठोकलं आहे. पंतने कसोटीत टी 20I स्टाईल खेळी करत कांगारुंच्या गोलंदाजांना झोडून काढला. पंतने या अर्धशतकी खेळी दरम्यान मैदानात जोरदार फटकेबाजी केली. पंतच्या या खेळीमुळे टीम इंडियाला 100 पेक्षा अधिक धावांची झटपट आघाडी घेता आली. तसेच पंतने या अर्धशतकासह तिघांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

पंतकडून तिघांचा रेकॉर्ड उद्धवस्त

ऋषभ पंतने 22 व्या ओव्हरमधील दुसर्‍या बॉलवर मिचेल स्टार्कला सिक्स ठोकत अर्धशतक पूर्ण केलं. पंतच्या कसोटी कारकीर्दीतील हे 15 वं अर्धशतक ठरलं. तसेच पंतचं हे या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं. पंतने अवघ्या 29 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 6 फोरसह 186.21 च्या स्ट्राईक रेटने ही फिफ्टी केली. पंत यासह टीम इंडियाकडून कसोटीत वेगवान अर्धशतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. टीम इंडियासाठी वेगवान अर्धशतकाचा विक्रमही पंतच्याच नावे आहे. सोबतच पंत ऑस्ट्रेलियात वेगवान अर्धशतक करणारा पहिला पाहुणा फलंदाज ठरला आहे.

टीम इंडियासाठी कसोटीतील वेगवान अर्धशतक

  • ऋषभ पंत विरुद्ध श्रीलंका, 28 चेंडू, 2022
  • ऋषभ पंत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 29 चेंडू, 2025
  • कपिल देव विरुद्ध पाकिस्तान, 30 चेंडू, 1982
  • शार्दूल ठाकुर विरुद्ध इंग्लंड, 31 बॉल, 2021
  • यशस्वी जयस्वाल विरुद्ध बांग्लादेश, 31 बॉल, 2024

ऋषभ पंतची स्फोटक खेळी

पाचव्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड.

पाचव्या कसोटीसाठी टीम इंडिया : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.