IND vs AUS: टी 20i सीरिजसाठी टीममध्ये अचानक 4 बदल, स्टार ऑलराउंडरचं कमबॅक, आणखी कुणाला संधी?
Australia vs India T20i Series 2025 : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 29 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान 5 टी 20i सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी तडकाफडकी टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला अजूनही विजयाचं खातं उघडता आलं नाहीय. भारताला सलग 2 एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं. आता उभयसंघातील तिसरा सामना हा 25 ऑक्टोबरला होणार आहे. त्यानंतर 29 ऑक्टोबरपासून 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. सूर्यकुमार यादव या टी 20i मालिकेत भारताचं नेतृत्व करणार आहे. तर मिचेल मार्श हाच कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाने टी 20i मालिकेसाठी अनेक बदल केले आहेत. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी 24 ऑक्टोबरला टी 20i संघात बदल केल्याचं जाहीर केलंय. अनुभवी ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल आणि वेगवान गोलंदाज बेन ड्वारशुईस या दोघांचं टी 20i कमबॅक झालं आहे. हे दोघेही दुखापतीमुळे बाहेर होते. या दोघांना फक्त तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी संधी देण्यात आली आहे.
दोघांना काय झालं होतं?
मॅक्सवेलला न्यूझीलंड दौऱ्यातील टी 20i मालिकेआधी फ्रॅक्चर झालं होतं. तर ड्वारशुईस याला दुखापतीमुळे टीम इंडिया विरूद्धच्या वनडे सीरिजला मुकावं लागलं होतं.
आणखी कुणाला संधी?
ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने वेगवान गोलंदाज महली बियर्डमॅन याला पहिल्यांदाच संधी दिली आहे. बियर्डमॅनला केवळ तिसऱ्या सामन्यासाठी संधी देण्यात आलीय. बियर्डमॅनचा जोश हेझलवूड याच्या जागी समावेश करण्यात आला आहे.
वेगवान गोलंदाज सीन एबॉट याला तिसऱ्या टी 20i सामन्यानंतर रिलीज करण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय. एबॉटला काही दिवसांपूर्वी विक्टोरीया विरुद्धच्या सामन्यात हाताला दुखापत झाली होती. तेव्हापासून एबॉट विश्रांतीवर होता. तसेच विकेटकीपर जोश फिलीप याला टी 20i मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलिया टीममध्ये अनेक बदल
🚨 MAJOR CHANGES IN AUSTRALIAN SQUAD vs INDIA 🚨
– Maxwell will play 3,4,5 matches in T20I – Dwarshuis will play 4,5 matches in T20I – Josh Phillipe will be part of all T20I – Mahli Beardman will play 3,4,5 matches in T20I – Hazelwood will only play first 2 T20I – Sean Abbott… pic.twitter.com/NnQpAvcI5y
— Johns. (@CricCrazyJohns) October 24, 2025
टीम इंडिया विरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा सुधारित संघ : मिचेल मार्श (कर्णधार), झेव्हीयर बार्टलेट, टीम डेव्हीड, नॅथन एलिस, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मैथ्यू कुहनेमॅन, मिचेल ओवेन, जोश फिलिप, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोयनिस, एडम झॅम्पा, महली बियर्डमॅन (शेवटच्या 3 सामन्यांसाठी), सीन एबॉट (पहिल्या 3 सामन्यांसाठी), बेन ड्वार्शुइस (शेवटच्या 2 सामन्यांसाठी), जोश हेझलवुड (पहिल्या 2 सामन्यांसाठी) आणि ग्लेन मॅक्सवेल (शेवटच्या 3 सामन्यांसाठी).
