AUS vs IND : तिसऱ्या वनडेआधी टीममधून या खेळाडूची सुट्टी, अचानक मोठा निर्णय
Australia vs India 3rd Odi : यजमान ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. तर तिसऱ्या सामन्याआधी टीममधून फलंदाजाला रिलीज करण्यात आलं आहे.

शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडियाची एकदिवसीय मालिकेतील सुरुवात निराशाजनक राहिली. यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सलग 2 वेळा पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाने 19 ऑक्टोबरला भारतावर डीएलएसनुसार 7 विकेट्सने विजय मिळवला. तर 23 ऑक्टोबरला कांगारुंनी भारतावर 2 विकेट्सने मात केली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 3 सामन्यांची मालिका आपल्या नावावर केली. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली. तसेच टीम इंडियाला एडलेडमध्ये 2008 नंतर पहिल्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. आता उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना हा शनिवारी 25 नोव्हेंबरला होणार आहे. हा सामना सिडनीत होणार आहे. या सामन्याच्या काही तासांआधी मोठी अपडेट समोर आली आहे.
क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय
ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने तिसऱ्या वनडे मॅचआधी मोठा निर्णय घेतलाय. बोर्डाने फलंदाज मार्नस लबुशेन याला वनडे टीममधून रिलीज केलं आहे. लबुशेन येत्या काही दिवसांनी प्रतिष्ठेच्या शेफील्ड शील्ड स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यासाठी लबुशेन याला एकदिवसीय संघातून मुक्त करण्यात आलं आहे.
कॅमरुन ग्रीन याच्या जागी संधी
लबुशेन याचा टीम इंडिया विरुद्ध पर्थमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात संघात समावेश करण्यात आला होता. ऑलराउंडर कॅमरुन ग्रीन याला झालेल्या दुखापतीमुळे लबुशेनला संधी मिळाली होती. मात्र लबुशेनचा एडलेडमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नाही.
ऑलराउंडरचा समावेश
निवड समितीने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यासाठी ऑलराउंडर जॅक एडवर्ड्स याला संधी दिली आहे. मॅथ्यु कुहनमॅन हा देखील टीममध्ये आहे. तर जोश इंग्लिस याला विकेटकीपर म्हणून तिसऱ्या सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकते.
दरम्यान टीम इंडियासमोर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाला 3-0 ने जिंकण्यापासून रोखण्याचं आव्हान आहे. आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रोखण्यात यशस्वी ठरणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
मार्नस लबुशेनची एकदिवसीय कारकीर्द
मार्नस लबुशेन याने ऑस्ट्रेलियाचं आतापर्यंत एकूण 66 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. लबुशेनने त्यापैकी 58 डावांत 34.65 च्या सरासरीने आणि 83.57 अशा स्ट्राईक रेटने एकूण 1 हजार 871 धावा केल्या आहेत. तसेच लबुशेन याने एकदिवसीय कारकीर्दीत 12 अर्धशतकं आणि 2 शतकंही झळकावली आहेत.
