AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Australia: ऑस्ट्रेलियाला दुहेरी झटका, दुखापतीमुळे स्टार बॉलर मालिकेतून बाहेर

Australia Cricket team : ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमला महिन्याभरात दुसरा झटका लागला आहे. ऑस्ट्रेलियाचा दुसरा गोलंदाज दुखापतीमुळे आगामी मालिकेतून बाहेर झाला आहे.

Australia: ऑस्ट्रेलियाला दुहेरी झटका, दुखापतीमुळे स्टार बॉलर मालिकेतून बाहेर
australia cricket teamImage Credit source: Icc X account
| Updated on: Aug 24, 2024 | 11:22 PM
Share

स्ट्रेलिया क्रिकेट टीम सप्टेंबर महिन्यात स्कॉटलँड आणि इंग्लंड दौरा करणार आहे. ऑस्ट्रेलिया यादौऱ्यात दोन्ही संघांविरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. स्कॉटलँड विरूद्धच्या मालिकेला 4 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर इंग्लंड विरूद्धची टी 20i सीरिज 11 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या मालिकेआधीच ऑस्ट्रेलियाचा फास्टर बॉलर स्पेन्सर जॉन्सन हा या दुखापतीमुळे दोन्ही मालिकांमधून बाहेर झाला. स्पेन्सरच्या जागी सीन एबोटला संधी देण्यात आली. त्यानंतर आता मालिकेला काही दिवस असताना ऑस्ट्रेलियाचा आणखी एक गोलंदाज हा दुखापतीच्या जाळ्यात अडकला आहे.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याला दुखापतीमुळे स्कॉटलँड विरूद्धच्या टी 20i मालिकेला मुकावं लागणार आहे. आयसीसीने याबाबतची माहिती एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे. त्यामुळे स्कॉटलँड विरूद्धच्या मालिकेसाठी आता हेझलवूडच्या जागी रिले मेरेडिथ याचा समावेश करण्यात आला आहे.जोश हेझलवूड गेल्या आठवड्यात सराव करत होता. हेझलवूड याला या दरम्यान पोटरीला दुखापत झाली. हेझलवूडवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून होते. मात्र त्याचं स्कॉटलँड विरूद्धच्या मालिकेत खेळणं शक्य नसल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे.

हेझलवूडच्या जागी रिले मेरेडिथ याचा समावेश केला गेला आहे. रिलेने ऑस्ट्रेलियाकडून अखेरचा टी 20i सामना हा 3 वर्षांपूर्वी 2021 साली खेळला होता. उभयसंघातील टी 20i मालिकेला 4 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा शनिवारी 7 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. तर दुसरा सामना हा 6 सप्टेंबरला होणार आहे.

स्कॉटलँड विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी 20i सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, बुधवार 4 सप्टेंबर

दुसरा सामना, शुक्रवार 6 सप्टेंबर

तिसरा सामना, शनिवार 7 सप्टेंबर

जोश हेझलवूड दुखापतीमुळे टी20i मालिकेतून बाहेर

स्कॉटलँड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाचा सुधारित संघ: मिचेल मार्श (कॅप्टन), झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेवीहिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमरुन ग्रीन, ॲरॉन हार्डी, रिले मेरेडिथ, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, सीन एबॉट, मार्कस स्टॉयनिस आणि ॲडम झॅम्पा.

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20i सीरिजसाठी स्कॉटलँड टीम : रिची बेरिंग्टन (कॅप्टन), चार्ली कॅसल, मॅथ्यू क्रॉस, ब्रॅडली करी, जॅस्पर डेव्हिडसन, ख्रिस ग्रीव्ह्ज, ओली हेअर्स, जॅक जार्विस, मायकेल जोन्स, मायकेल लीस्क, ब्रँडन मॅकमुलेन, जॉर्ज मुन्से, साफयान शरीफ, ख्रिस सोल, चार्ली टीयर, मार्क वॅट आणि ब्रॅडली व्हील.

Follow Us
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार.
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट...
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट....
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव.
लाडकी बहिण योजने बाबत सर्वात मोठी अपडेट! अपात्र बहिणींकडून होणार वसूली
लाडकी बहिण योजने बाबत सर्वात मोठी अपडेट! अपात्र बहिणींकडून होणार वसूली.
जवळच्या व्यक्तीनेच केला खरातचा गेम! फार्महाऊसवरील नको ते व्हिडीओ गोळा
जवळच्या व्यक्तीनेच केला खरातचा गेम! फार्महाऊसवरील नको ते व्हिडीओ गोळा.
रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक, 'राजा शिवाजी'चि
रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक, 'राजा शिवाजी'चि.
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री..
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका.