AUS vs ENG Ashes series 2nd Test, Day 5: ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला लोळवलं, 275 धावांनी दणदणीत विजय

ऑस्ट्रेलियाला विजयासाठी सहा विकेटची आवश्यकता होती. दुसऱ्या डावात इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने (44) थोडाफार प्रतिकार केला. अन्य फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. इं

AUS vs ENG Ashes series 2nd Test, Day 5: ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला लोळवलं, 275 धावांनी दणदणीत विजय
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 4:10 PM

अ‍ॅडलेड: अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes series) दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर शानदार विजय मिळवत मालिकेत 2-0 आघाडी घेतली आहे. अ‍ॅडलेड ओव्हलच्या मैदानावर झालेल्या डे-नाईट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा तब्बल 275 धावांनी पराभव केला. यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर (Australia vs England) विजयासाठी 468 धावांचे लक्ष्य ठेवले होते. काल चौथ्यादिवस अखेरीस इंग्लंडची वाईट अवस्था झाली होती.

ऑस्ट्रेलियाला विजयासाठी सहा विकेटची आवश्यकता होती. दुसऱ्या डावात इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने (44) थोडाफार प्रतिकार केला. अन्य फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. इंग्लंडचा दुसरा डाव 192 धावात आटोपला. आज सकाळी डावाला सुरुवात केल्यानंतर इंग्लंडला ओली पोपच्या (4) रुपाने पहिला धक्का बसला. त्यानंतर बेन स्टोक्सला (12) धावांवर लेयॉनने पायचीत पकडले. इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि डेविड मलान यांच्यासारखे फॉर्ममध्ये असलेले फलंदाज काल स्वस्तात बाद झाले होते.

रिचर्डसनने भेदक मारा करत इंग्लंडच्या निम्म्या संघाला तंबूत पाठवले. वेगवान गोलंदाज स्टार्क आणि लेयॉनने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावणारा मार्क्स लाबुशेन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. यजमान ऑस्ट्रेलियाने या मालिकेत दमदार कामगिरी करत आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड 2-0 ने पिछाडीवर आहे.

संबंधित बातम्या:

India vs South Africa: पुढचे तीन दिवस महत्त्वाचे, हेड कोच राहुल द्रविड असं का म्हणाले?

India south africa tour: पहिल्या कसोटीत स्टेडियममध्ये प्रेक्षकांमधून ‘इंडिया, इंडिया’चा जयघोष ऐकू येणार नाही, कारण….

IND VS SA : विराट कोहलीचा शतकांचा दुष्काळ संपणार, राहुल द्रविडच्या तालमीत विराटचा सराव

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.