AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर ऑस्ट्रेलियन संघाला 15 वर्ष कर्णधार मिळणार नाही; मायकल क्लार्कने दाखवला आरसा

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासमोर नवा कर्णधार निवडण्याचे आव्हान कायम आहे. सेक्सटिंगमुळे टीम पेनने कर्णधारपद सोडल्यानंतर कोणतीही नवीन नियुक्ती झालेली नाही.

...तर ऑस्ट्रेलियन संघाला 15 वर्ष कर्णधार मिळणार नाही; मायकल क्लार्कने दाखवला आरसा
Michael Clarke
| Edited By: | Updated on: Nov 24, 2021 | 5:18 PM
Share

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासमोर नवा कर्णधार निवडण्याचे आव्हान कायम आहे. सेक्सटिंगमुळे टीम पेनने कर्णधारपद सोडल्यानंतर कोणतीही नवीन नियुक्ती झालेली नाही. इंग्लंडविरुद्ध अॅशेस मालिका लवकरच सुरू होणार आहे. दरम्यान, कर्णधाराबाबत सुरू असलेल्या वादावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने स्वतःचं मत मांडलं आहे. (Australia will be without captain for 15 years if we are looking for perfect skipper says Michael Clarke)

क्लार्क म्हणाला की, देशाचं क्रिकेट मंडळ परिपूर्ण आणि स्वच्छ प्रतिमेचा खेळाडू शोधत राहिलं तर ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाला पुढील 15 वर्षे कर्णधाराशिवाय खेळावं लागेल. सध्या वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि स्टीव्ह स्मिथ कर्णधारपदाच्या शर्यतीत आहेत. दोघांच्याही मुलाखती झाल्या आहेत. यापूर्वी स्टीव्ह स्मिथची जागा टीम पेनने घेतली होती. सँडपेपर प्रकरणामुळे स्मिथला पायउतार व्हावे लागले होते.

मायकेल क्लार्कने सांगितले की, रिकी पॉन्टिंग त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत खराब सुरुवात करूनही ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार बनला. बिग स्पोर्ट्स ब्रेकफास्ट शोमध्ये तो म्हणाला, मी जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होतो, तो काळ पाहा, रिकी पॉन्टिंगला पाहा, त्यावेळी अशी मागणी (परिपूर्ण आणि स्वच्छ प्रतिमेचा खेळाडू) असती तर तो कधीच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होऊ शकला नसता. पॉन्टिंग सुरुवातीलाच बऱ्याचदा अडखळला होता. म्हणून कोणी त्याला त्या पदावरुन पायऊतार व्हायला सांगितलं नाही. तो एक उत्कृष्ट उदाहरण आहे. वेळ, अनुभव, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्याने त्याच्यात बदल होत गेले.

पेन पहिल्या कसोटीत खेळणार नाही

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना 8 डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने टीम पेनच्या रूपाने केवळ एकच स्पेशलिस्ट विकेटकीपर ठेवला आहे. पण संघाचे मुख्य निवडकर्ते जॉर्ज बेली म्हणाले की, पेन पहिल्या कसोटीत खेळणार की नाही, हे अद्याप निश्चित नाही. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार हा उच्च दर्जाचा असला पाहिजे, असे मायकल क्लार्कने सांगितले. पण अवास्तव अपेक्षा ठेवल्या तर पर्याय खूप कमी होतील, असंही त्याने नमूद केलं.

अर्थात, तुम्हाला काही स्टँडर्ड सेट करावे लागतील पण तुम्ही त्याला वेळ देऊ शकता, तो बदलू शकतो, तो हुशार असू शकतो. खेळाडूंना थोडा पाठिंबा द्यायला हवा. ज्याने काही चुकीचे केले नाही असा खेळाडू कर्णधार म्हणून तुम्हाला हवा असेल तर पुढची 15 वर्षे आपल्याकडे कर्णधार नसेल.

पेनने कर्णधारपद सोडल्याने क्लार्क नाखूश

टीम पेनच्या राजीनाम्याबाबत मायकेल क्लार्क म्हटले की, 2017 च्या घटनेमुळे त्याने राजीनामा का दिला हे मला अजून समजले नाही. क्लार्कच्या म्हणण्यानुसार, जर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड म्हटलं असतं की, आता कोणताही पर्याय नाही, तेव्हा तो म्हणू शकला असता की, तुम्हाला मला हटवायचे असेल तर तुम्ही मला हटवू शकता. परंतु मी ही माहिती चार वर्षांपूर्वी दिली होती. मी प्रामाणिक आणि स्पष्ट होतो. आता ही बाब सार्वजनिक केल्यामुळे नियम बदलले का? मला नाही वाटत की, असे काही होईल.

इतर बातम्या

ICC T20I Rankings: केएल राहुल भारताचा नंबर 1 फलंदाज, कोहली टॉप-10 मधून बाहेर, रोहितची मोठी उडी

टीम इंडियाच्या डाएट प्लॅनमध्ये हलाल?, सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग, BCCI चा वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

IPL 2022: आयपीएलचा 15 वा हंगाम ‘या’ तारखेपासून? CSK ची पहिली लढत कुणाशी?

(Australia will be without captain for 15 years if we are looking for perfect skipper says Michael Clarke)

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.