Icc Odi Ranking मध्ये पुन्हा मोठा उलटफेर, हा क्रिकेटर पुन्हा नंबर 1
Icc Odi Ranking | आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलने वनडे रँकिंग जाहीर केली आहे.या रँकिंगमध्ये बॉलर आणि बॅट्समन यादीत नंबर 1 कोण आहे? जाणून घ्या आत्ताच्या आता.

मुंबई | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या दरम्यान आयसीसीने रँकिंग जाहीर केली आहे. या वनडे रँकिंगमध्ये टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिल याला मोठा फटका बसला आहे. तर पाकिस्तानचा माजी कर्णधार पुन्हा एकदा नंबर 1 होण्यात यशस्वी ठरला आहे. बाबर आझम याने शुबमन गिल याच्याकडून नंबर 1 हिसकावून घेतला आहे. बाबर वनडे क्रिकेटमधला किंग ठरला आहे. तसेच फलंदाजांच्या यादीत टॉप 5 मध्ये शुबमनसह 3 भारतीयांचा समावेश आहे
शुबमन गिल याला फार काळ नंबर 1 राहता आलं नाही. आयसीसीने आज बुधवारी क्रमवारी जाहीर केली. त्यानुसार बाबरने शुबमनला मागे टाकलं. शुबमन गिल नोव्हेंबर महिन्यात आयसीसी वनडे वर्ल्ड कप दरम्यान नंबर 1 ठरला होता. मात्र त्यानंतर शुबमन गिल एकदिवसीय सामने न खेळल्याने त्याचा फटका बसला आहे. बाबर आणि शुबमन या दोघांमध्ये 14 रेटिंग्स पॉइंट्सचं अंतर आहे. बाबर 824 रेटिंग्सह अव्वलस्थानी विराजमान आहे. तर शुबमनच्या नावावर 810 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.
तसेच शुबमन व्यतिरिक्त टीम इंडियाचा विराट कोहली आणि कॅप्टन रोहित शर्मा हे दोघे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. या दोघांना आपलं स्थान कायम राखण्यात यश आलं आहे. विराटच्या नावावर 775 तर रोहित शर्माच्या नावावर 754 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. तसेच श्रेयस अय्यर याची एका स्थानाने घसरुन 12 व्या क्रमांकावर आला आहे. तर केएल राहुल याला एका स्थानाचा फायदा झाल्याने तो 16 व्या क्रमांकावर पोहचला आहे. केएल सध्या दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करतोय.
आयसीसी रँकिंगमध्ये अदलाबदल, कोण कुठे?
New No.1 T20I bowler 🏅 New No.1 ODI batter 🏅
Wholesale changes at the top of the charts in the latest @MRFWorldwide ICC Men’s Player Rankings 😲https://t.co/Q4Qusm53Q5
— ICC (@ICC) December 20, 2023
केशव महाराज अव्वलस्थानी
दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज हा वनडे बॉलिंग रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी कायम आहे. तर ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड दुसऱ्या आणि टीम इंडियाचा मोहम्मद सिराज तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याशिवाय जसप्रीत बुमराह पाचव्या, कुलदीप यादव आठव्या आणि मोहम्मद शमी 11 व्या क्रमांकावर आहे. तर स्पिनर रवींद्र जडेजा 22 व्या क्रमांकावर आहे. तसेच अष्टपैलू खेळाडूंमध्ये बांगलादेशचा शाकिब अल हसन याने नेहमीप्रमाणे पहिलं स्थान कायम ठेवलंय. तर रवींद्र जडेजा 12 व्या आणि हार्दिक पंड्या 17 व्या स्थानी आहे.
