AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : अचानक बदलला टी 20i संघाचा कर्णधार, आता या खेळाडूकडे नेतृत्व

Captain : न्यूझीलंड क्रिकेट टीमला बांगलादेश दौऱ्यावर टी 20i मालिकेआधी मोठा झटका लागला. न्यूझीलंडला पहिल्या सामन्यासाठी कर्णधार बदलावा लागला. जाणून घ्या न्यूझीलंडच्या नियमित कर्णधाराला काय झालं.

Cricket : अचानक बदलला टी 20i संघाचा कर्णधार, आता या खेळाडूकडे नेतृत्व
India vs New Zealand T20iImage Credit source: Bcci
| Updated on: Apr 27, 2026 | 5:54 PM
Share

न्यूझीलंड क्रिकेट टीम सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. न्यूझीलंडच्या बांगलादेश दौऱ्याची सुरुवात ही एकदिवसीय मालिकेने झाली. न्यूझीलंडने बांगलादेशला पराभूत करत एकदिवसीय मालिकेत विजयी सलामी दिली. मात्र त्यानंतर यजमान बांगलादेशने जोरदार कमबॅक केलं. बांगलादेशने सलग 2 सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली. बांगलादेशने न्यूझीलंड विरुद्धची 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर आता उभयसंघात 27 एप्रिलपासून 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. त्याआधी न्यूझीलंड क्रिकेट टीमला मोठा झटका लागला आहे.

न्यूझीलंडचा नियमित कर्णधार टॉम लॅथम याला दुखापतीमुळे बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या टी 20i सामन्याला मुकावं लागलं आहे. त्यामुळे न्यूझीलंडला पहिल्या टी 20i सामन्यासाठी नाईलाजाने कर्णधार बदलावा लागला आहे.

टॉम लॅथम हा न्यूझीलंडचा नियमित टी 20i कर्णधार आहे. मात्र टॉमला पहिल्या सामन्याआधी दुखापत झाली. त्यामुळे टॉमला दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे टी 20 क्रिकेटमध्ये फक्त 5 सामने खेळलेल्या खेळाडूला पहिल्या सामन्यासाठी कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. टॉम लॅथम याच्या अनुपस्थितीत निक केली याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. निक अशाप्रकारे न्यूझीलंडचा 13 वा कर्णधार ठरला आहे.

निक केलीबाबत महत्त्वाची माहिती

निक न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व करत असला तरी त्याचा जन्म हा ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमधील आहे. निकने न्यूझीलंडच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. निकने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 18 शतकं झळकावली. त्याला याच कामगिरीच्या जोरावर निकला न्यूझीलंड संघात संधी मिळाली. निकने 15 मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20i पदार्पण केलं होतं. तर निकने पाकिस्तान विरुद्ध 2025 साली एकदिवसीय पदार्पण केलं.

टॉमला दुखापत कशी झाली?

टॉमला सरावादरम्यान घोट्याला दुखापत झाली. टॉमला बॅटिंगचा सराव करताना उजव्या पायाला बॉल लागला. त्यामुळे टॉमला पहिल्या सामन्यात खेळता येणार नसल्याचं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून जाहीर करण्यात आलं. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

निकची बांगलादेश विरुद्धची कामगिरी

दरम्यान निकने बांगलादेश विरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी केली. निकची मालिकेत निराशाजनक सुरुवात झाली. निक सलामीच्या सामन्यात 7 धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर निकने सलग 2 अर्धशतकं झळकावली. निकने दुसऱ्या सामन्यात 83 धावा केल्या. तर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात निकने 59 धावांची खेळी केली.

Follow Us
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है