AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशचा कर्णधार लिट्टन दासला वाटतंय भीती, मनातल्या भावना सरळ सांगून टाकल्या

बांग्लादेश टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत अस्पष्टता आहे. कारण एकीकडे आयसीसीने अल्टिमेटम दिला आहे. दुसरीकडे, बीसीबी आपल्या मागणीवर ठाम आहे. असं असताना बांगलादेशचा कर्णधार लिट्टन दासचं विधान समोर आलं आहे. त्यामुळे बांगलादेशच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

बांगलादेशचा कर्णधार लिट्टन दासला वाटतंय भीती, मनातल्या भावना सरळ सांगून टाकल्या
बांगलादेशचा कर्णधार लिट्टन दासला वाटतंय भीती, मनातल्या भावना सरळ सांगून टाकल्याImage Credit source: PTI
| Updated on: Jan 21, 2026 | 3:59 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. पण असं असताना बांगलादेशचं या स्पर्धेत खेळणं कठीण होत चाललं आहे. कारण आयसीसीने दिलेली डेडलाईन संपली असून बांग्लादेश भारतात खेळण्यास तयार नाही. आयसीसी या प्रकरणी लवकरच निकाल देणार आहे. बांगलादेशच्या जागी स्कॉटलँड संघाला स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, बांगलादेशचा कर्णधार लिट्टन दास याचं विधान चर्चेत आलं आहे. कारण त्याने स्वत: बांगलादेशमध्ये असुरक्षित असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. लिट्टन दासने एका पत्रकार परिषदेत टी20 वर्ल्डकप स्पर्धेबाबत विधान करताना सांगितलं. या मुद्द्यावर त्याला प्रश्न विचारल्यानंतर लिट्टन दास म्हणाला की, ‘या मुद्द्यावर मी काही बोलणं माझ्यासाठी सुरक्षित नाही.’ लिट्टन दासने पुढे स्पष्ट केलं की, संघातील कोणत्याही खेळाडूला टी20 वर्ल्डकप खेळणार की नाही ते माहिती नाही.

लिट्टन दासने कान टोचले!

लिट्टन दासने बांग्लादेश क्रिकेट बोर्डावर अप्रत्यक्षरित्या ताशेरे ओढले. बांग्लादेश संघाला माहिती असावं की टी20 वर्ल्डकप स्पर्धेत कोणत्या संघाविरुद्ध खेळणार आहोत. लिट्टन दास म्हणाला की, ‘जर आम्हाला माहित असते की आमच्या गटातील प्रतिस्पर्धी कोण असतील किंवा आम्ही कोणत्या देशात खेळणार आहोत, तर ते उपयुक्त ठरेल.” लिटन पुढे म्हणाला की, “तुम्ही पाहिले आहे की आम्ही संघ जाहीर केला आहे. परंतु आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला माहित नाही की आम्ही कोणत्या देशात जाणार आहोत किंवा आम्ही कोणाविरुद्ध खेळणार आहोत. माझ्याप्रमाणे, संपूर्ण बांगलादेश अनिश्चिततेत आहे.’

बांग्लादेश प्रीमियर लीगवरही प्रश्नचिन्ह

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसात ताणले गेले आहेत. बीसीसीसीआयच्या आदेशानंतर वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमान याला आयपीएलमधून काढून टाकलं. त्यानंतर दोन्ही देशात वाद टोकाला गेला आहे. बांगलादेशने टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतात संघ पाठवण्यास नकार दिला आहे. लिटन दास याने बांग्लादेश प्रीमियर लीग स्पर्धेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. बांग्लादेश प्रीमियर लीग स्पर्धेत इतके सामने खेळणं काही योग्य नव्हतं. लिट्टन दासने सांगितलं की,’जीवनात काही गोष्टी आदर्श नसतात. पण तुम्हाला त्या परिस्थितीनुसार मान्य कराव्या लागतात. बीपीएलमध्ये इतके सामने खेळणं काही योग्य नव्हतं. पण तरीही आम्हाला खेळायचं होतं.’

Follow Us
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा निर्णय
शिंद्यांचा आणि शिक्षणाचा संबंध आहे का?; राऊतांनी सरकारला धारेवर धरलं
Sanjay Raut | शिंद्यांचा आणि शिक्षणाचा काही संबंध आहे का?; संजय राऊतांनी सरकारला धारेवरच धरलं
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?