
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेची जोरदार तयारी सुरू आहे. भारत आणि श्रीलंका हे दोन्ही देश या स्पर्धेच्या यजमानपदासाठी सज्ज आहेत. पण बांग्लादेश क्रिकेट बोर्डाची नाटकं सुरु झाली आहेत. भारतात क्रिकेट खेळण्यास त्यांनी नकार दिला आहे. इतकंच काय तर आयसीसीपुढे गाऱ्हाणं घातलं आहे. भारतात क्रिकेट खेळणं धोक्याचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यासाठी वेगवेगळी कारण दिली जात आहेत. असं असताना बांग्लादेशी क्रीडामंत्र्यांनी धक्कादायक दावा केला आहे. बांगलादेशचे क्रीडामंत्री आसिफ नजरूल यांनी मीडियाशी बोलताना दावा केला की, आयसीसीच्या सुरक्षा टीमने आपलं म्हणणं बीसीबीसमोर ठेवलं आहे. त्यात आयसीसीने बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला सांगितलं की, बांगलादेशी खेळाडूंसाठी सुरक्षेचा मुद्दा मोठा असणार आहे. खासकरू मुस्तफिझुर रहमाना भारतात आल्यानंतर हा प्रश्न आणखी चिघळेल. मंत्र्याने केलेल्या विधानानंतर मुस्तफिझुर रहमान भारतात आला तर बांगलादेशी संघ अडचणीत येऊ शकतो.
बांगलादेशच्या क्रीडामंत्र्यांनी केलेल्या दाव्यानुसार, सामना पाहण्यासाठी बांगलादेशी चाहतेही मैदानात हजेरी लावतील. पण त्यांनी जर्सी परिधान केली तर स्टेडियममध्ये काहीही होऊ शकते. निवडणुका जवळ असल्याने हा मोठा मुद्दा होऊ शकतो. सुरक्षेच्या दृष्टीने आयसीसीने बांग्लादेश क्रिकेट बोर्डासमोर प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावानुसार, बांगलादेशचे सामने चेन्नई किंवा तिरूवनंतपुरम येथे खेळले जातील. पण बांगलादेशच्या क्रीडा सल्लागारांनी हा प्रस्ताव मूर्खपणा असल्याचे सांगून फेटाळून लावला आहे. त्यामुळे नेमकं खरं कोण आणि खोटं कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Bangladesh’s sports minister Asif Nurul’s claims of a security letter from ICC were subsequently clarified by Deputy Press Secretary Azad Majumdar, who said the threat assessments were in fact part of an inter-departmental note 👀 pic.twitter.com/tTXq6W6Ez1
— Cricbuzz (@cricbuzz) January 12, 2026
दरम्यान, बांग्लादेश क्रीडामंत्र्यांनी केलेला दावा खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे. मिडिया रिपोर्टनुसार, आयसीसीने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. या प्रकरणी आयसीसी लवकरच अधिकृत निवेदन जाहीर करण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, बीसीसीआय बांगलादेशचे सर्व सामने कोलकाता आणि मुंबईहून विशाखापट्टणम आणि चेन्नईला शिफ्ट करू शकते. पण याबाबत स्पष्ट असं काहीच समोर आलेलं नाही. आता आयसीसी या प्रकरणी काय खुलासा करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.