AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bcci: टीम इंडियाचं वर्ल्ड कपनंतरचं वेळापत्रक जाहीर, 3 संघांविरुद्ध भिडणार

Team India Schedule: बीसीसीआयने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेदरम्यान टीम इंडियाच्या मायदेशातील आगामी मालिकांची घोषणा केली आहे.

Bcci: टीम इंडियाचं वर्ल्ड कपनंतरचं वेळापत्रक जाहीर, 3 संघांविरुद्ध भिडणार
rohit sharma huddle talk team india
| Updated on: Jun 20, 2024 | 5:31 PM
Share

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत टीम इंडिया सुपर 8 मधील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज आहे. सुपर 8 मध्ये विजयी सलामी देण्यासाठी टीम इंडियाने जोरदार तयारी केली आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये या सामन्यासाठी उत्सुकतेचं वातावरण आहे. अशात दुसऱ्या बाजूला बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने भारतीय संघाचं आगामी काही मालिकांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बांग्लादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंड भारत दौरा करणार आहेत. बीसीसीआयने या तिन्ही दौऱ्यांमधील मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

टीम इंडिया बांग्लादेश विरुद्ध कसोटी आणि टी 20 मालिका खेळणार आहे.त्यानंतर न्यूझीलंड भारत दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. तर इंग्लंड वर्षाअखेरीस टीम इंडिया विरुद्ध टी 20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे. बीसीसीआयने या तिन्ही मालिकेतील सामन्यांचं ठिकाण, वेळ या बाबी जाहीर केल्या आहेत. बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची घोषणा केली आहे.

टीम इंडिया आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर झिंबाब्वे आणि श्रीलंका दौरा करणार आहे. टीम इंडिया झिंबाब्वे विरुद्ध 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. तर त्यांनतर श्रीलंका विरुद्ध प्रत्येकी 3-3 सामन्यांची वनडे आणि टी 20 मालिका होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया भारतात परतेल. त्यानंतर टीम इंडियाच्या मायदेशातील मालिकांना सुरुवात होईल. बांग्लादेश भारत दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध 2 कसोटी आणि 3 टी 20 सामने खेळणार आहे. त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका पार पडेल. त्यानंतर इंग्लंड भारत दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध 5 सामन्यांची टी 20 मालिका आणि 3 एकदिवसीय सामने  खेळणार आहे.

टीम इंडियाचं मायदेशातील वेळापत्रक

बांगलादेशचा भारत दौरा

19-23 सप्टेंबर, चेन्नई, पहिला कसोटी सामना, चेन्नई.

27 सप्टेंबर-1 ऑक्टोबर, दुसरा कसोटी सामना, कानपूर.

टी 20 मालिका

6 ऑक्टोबर, धर्मशाला, पहिला सामना

9 ऑक्टोबर, दिल्ली, दुसरा सामना

12 ऑक्टोबर, हैदराबाद, तिसरा सामना

न्यूझीलंडचा भारत दौरा, कसोटी मालिका वेळापत्रक

पहिला सामना, 16-20 ऑक्टोबर, बंगळुरु

दुसरा सामना, 24-28 ऑक्टोबर, पुणे

तिसरा सामना, 1-5 नोव्हेंबर, मुंबई

इंग्लंडचा भारत दौरा, वर्ष-2025

टी 20 मालिका

22 जानेवारी, पहिला सामना, चेन्नई

25 जानेवारी, दुसरा सामना, कोलकाता

28 जानेवारी, तिसरा सामना, राजकोट

21 जानेवारी, चौथा सामना, पुणे

2 फेब्रुवारी, पाचवा सामना, मुंबई

एकदिवसीय मालिका

6 फेब्रुवारी, पहिला सामना, नागपूर

9 फेब्रुवारी, दुसरा सामना, कटक

12 फेब्रुवारी, तिसरा सामना, अहमदाबाद

प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप.