U19 WC जिंकल्यानंतर टीम इंडिया मालामाल, बीसीसीआयची मोठी घोषणा
U 19 Womens Team India : अंडर 19 वूमन्स टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत टी 20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाच्या विजयानंतर बीसीसीआयने पेटारा उघडला आहे.

अंडर 19 वूमन्स टीम इंडियाने रविवारी 2 फेब्रुवारीला इतिहास घडवला. टीम इंडियाने निकी प्रसाद हीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने धुव्वा उडवत सलग आणि एकूण दुसर्यांदा अंडर 19 वूमन्स टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. उपकर्णधार सानिका चाळके हीने विजयी चौकार लगावत भारताला विश्व विजेता केलं. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेलं 83 धावांचं माफक आव्हान भारताने अवघी 1 विकेट गमावत 11.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाच्या या विजयानंतर बीसीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूला, सपोर्ट स्टाफ आणि कोचिंग स्टाफसाठी बक्षिस जाहीर केलं आहे.
अंडर 19 वूमन्स टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळेच टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा अंडर 19 वूमन्स टी 20 वर्ल्ड कप जिंकता आला. या उल्लेखनीय कामगिरीसाठी आणि सन्मानासाठी हेड कोच नुशिन अल खादीर यांच्या मार्गदर्शनाखालील विजयी संघ आणि सपोर्ट स्टाफला रोख 5 कोटी रुपये देणार आहे”, अशी माहिती बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
टीम इंडिया अजिंक्य
दरम्यान टीम इंडियाने या वर्ल्ड कपमध्ये एकही सामना गमावला नाही. टीम इंडियाने खेळलेले सर्व सामने जिंकले. टीम इंडियाने साखळी फेरीतील 3, सुपर 6 मधील 2, त्यानंतर उपांत्य आणि अंतिम असे एकूण आणि सलग 7 सामने जिंकले.
बीसीसीआयची घोषणा, खेळाडू मालामाल
BCCI Congratulates #TeamIndia Women’s U19 Team for Back-to-Back T20 World Cup Triumphs, announces a cash reward of INR 5 Crore for the victorious squad and support staff, led by Head Coach Nooshin Al Khadeer.#U19WorldCup
Details 🔽
— BCCI (@BCCI) February 2, 2025
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : कायला रेनेके (कर्णधार), जेम्मा बोथा, सिमोन लॉरेन्स, डायरा रामलाकन, फे काउलिंग, काराबो मेसो (विकेटकीपर), मिके व्हॅन वुर्स्ट, सेशनी नायडू, ॲश्लेग व्हॅन विक, मोनालिसा लेगोडी आणि नथाबिसेंग निनी.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), जी कमलिनी (विकेटकीपर), गोंगडी त्रिशा, ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, आयुषी शुक्ला, जोशिता व्ही जे, शबनम एम डी शकील, पारुनिका सिसोदिया आणि वैष्णवी शर्मा.
