AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BCCI Announces Women’s Team : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला संघ जाहीर, झुलनचं पुनरागमन, टी-20 संघात किरण नवगिरे

BCCI Announces Women's Team For England Tour : भारतीय महिला संघ इंग्लंडच्या दोन आठवड्यांच्या दौऱ्यावर जाणार आहे. यादरम्यान ती तीन टी-20 सामने आणि तितकेच एकदिवसीय सामने खेळणार आहे. 

BCCI Announces Women's Team : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला संघ जाहीर, झुलनचं पुनरागमन, टी-20 संघात किरण नवगिरे
BCCI Announces Women's Team For England TourImage Credit source: social
| Updated on: Aug 20, 2022 | 8:21 AM
Share

नवी दिल्ली :  बीसीसीआयनं (BCCI) भारताच्या आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा (BCCI Announces Women’s Team For England Tour) केली आहे. भारत 10 सप्टेंबर 2022 पासून इंग्लंडमध्ये तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.फलंदाज किरण नवगिरेचा इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या महिला टी-20 (T-20) संघात प्रथमच समावेश करण्यात आला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीचे इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे. भारतीय संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी इंग्लंडच्या दोन आठवड्यांच्या दौऱ्यावर जाणार आहे. यादरम्यान ती तीन टी-20 सामने आणि तितकेच एकदिवसीय सामने खेळणार आहे. T20 सामने होव्ह (10 सप्टेंबर), डर्बी (13 सप्टेंबर) आणि ब्रिस्टल (15 सप्टेंबर) येथे खेळवले जातील. तर एकदिवसीय सामने होव्ह (18 सप्टेंबर), कॅंटरबरी (21 सप्टेंबर) आणि लॉर्ड्स (24 सप्टेंबर) येथे खेळवले जातील.

तीन महिन्यांत 40 वर्षांची झालेल्या झुलन गोस्वामीने या वर्षी मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. मिताली राजने विश्वचषकानंतर निवृत्ती घेतली होती. तर वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे श्रीलंका दौऱ्यासाठी निवडले गेले नव्हते. यानंतर ती कदाचित निवृत्ती घेईल अशी अटकळ बांधली जात होती. पण आतापर्यंत 201 सामन्यात विक्रमी 252 विकेट घेणारा गोस्वामी खेळण्यासाठी तयार आहे.

रिचा घोष परतली

रिचा घोष टी-20 संघात परतली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी संघात तिची निवड न झाल्यामुळे प्रश्न उपस्थित झाले होते. तिच्या जागी निवड झालेल्या तानिया भाटियानं इंग्लंड दौऱ्यासाठी दोन्ही संघात स्थान मिळवले आहे. घोषला टी-20 संघात स्थान मिळाले आहे, तर यास्तिका भाटियाला वनडे संघात आपले स्थान कायम ठेवण्यात यश आले आहे. निवडकर्त्यांनी किरण नवगिरेला महिला T20 चॅलेंजमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल बक्षीस दिले. मूळचा महाराष्ट्राचा असलेला किरण देशांतर्गत क्रिकेटमध्ये नागालँडकडून खेळते.

तिने महिला टी20 चॅलेंजमध्ये ट्रेलब्लेझर्स फॉर वेलोसिटी विरुद्ध 34 चेंडूत 69 धावा केल्या, ज्यात पाच षटकारांचा समावेश होता. ती, शफाली वर्मा आणि रिचासह भारतीय संघाला पॉवर हिटिंगचे नवे आयाम जोडू शकते. अनुभवी वेगवान गोलंदाज शिखा पांडे आणि फिरकीपटू पूनम यादव यांच्याकडे पुन्हा दुर्लक्ष झाले.

संघ खालीलप्रमाणे

T20 संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, जेमिमा रॉड्रिग्स, स्नेह राणा, रेणुका ठाकूर, मेघना सिंग, राधा यादव, सबिनेनी मेघना, तानिया सपना , राजेश्वरी गायकवाड, दयालन हेमलता, सिमरन दिल बहादूर, रिचा घोष (wk), के.पी.नवगीर.

एकदिवसीय संघ :हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, सबीनीन मेघना, दीप्ती शर्मा, तानिया सपना भाटिया (डब्ल्यूके), यास्तिका भाटिया (डब्ल्यूके), पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रेणुका ठाकूर, मेघना सिंग , राजेश्वरी गायकवाड, हरलीन देओल, दयालन हेमलता, सिमरन दिल बहादूर, झुलन गोस्वामी, जेमिमा रॉड्रिग्ज.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.