IPL 2022 बाबत मोठी माहिती समोर, नव्या संघाच्या लिलावप्रक्रियेत बदल, बीसीसीआयने दिली माहिती

कोरोना विषाणूच्या संकटामुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल 2021 पुन्हा सुरु करण्यात आली असून आता स्पर्धेतील केवळ दोनच सामने उरले आहेत. त्यामुळे आता पुढील आयपीएलचे वेध लागले असून यावेळी 8 च्या जागी 10 संघ स्पर्धेत सामिल होणार आहेत.

IPL 2022 बाबत मोठी माहिती समोर, नव्या संघाच्या लिलावप्रक्रियेत बदल, बीसीसीआयने दिली माहिती
आयपीएल
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 6:18 PM

मुंबई :  आयपीएल 2021 (IPL 2021) चा अंतिम सामना आता एका दिवसावर येऊन ठेपला आहे. हा सामना होण्यापूर्वीच पुढील आयपीएलची (IPL 2022) तयारी बीसीसीआय़ने सुरु केली आहे. यावेळी आयपीएलमध्ये काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून बीसीसीआयने पुढील आयपीएलमध्ये संघाची संख्या वाढवून 8 च्या जागी 10 करणार असल्याची माहिती समोर आली होती. यासाठी एक टेंडर डॉक्यूमेंटही 31 ऑगस्टला आले आहे. दरम्यान 25 ऑक्टोबरला यावर बोली लागणार असून बीसीसीआयने या  टेंडरसंबधी (ITT) एक प्रेस रिलीज नुकतीच समोर आणली आहे.

यातील माहितीनुसार हे आईटीटी कागदपत्र विकत घेण्यासाठी 20 ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आला असून याची किंमत 10 लाख रुपये असणार आहे. ही किंमत नॉन रिफंडेबल असणार असल्याने एकदा भरल्यानंतर ती थेट बीसीसीआयच्या तिजोरीत जाणार आहे.

या कंपन्या संघ घेण्याची शक्यता

सध्या आयपीएलमध्ये असणाऱ्या बहुतेक टीम्स या मोठ्या कंपन्याच्या मालकिचे आहेत. त्याप्रमाणेच नव्या येणाऱ्या दोन संघासाठी देखील देशातील अनेक कॉर्पोरेट घरान्यांनी (कंपन्यानी) तयारी सुरु केली आहे.  टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार यामध्ये कोलकाता स्थित आरपी-संजीव गोयंका, अहमदाबाद स्थित अडानी ग्रुप, हैद्राबाद स्थित अरबिंदो फार्मा लिमिटेड आणि टॉरंट ग्रुप संघ घेण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान संजीव गोयंका ग्रुपची टीम रायसिंग पुणे सुपरजाएंट याआधी 2016 आणि 2017 हे दोन सीझन आयपीएलमध्ये खेळली होती. लिलावासंबधी माहिती देखील टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात समोर आली आहे. त्यानुसार बीसीसीआय या वर्षाच्या अखेरीस मोठा लिलाव भरवण्याची शक्यता आहे. तसेच मीडिया राइट्सबाबतचा मोठा लिलावही यावेळी होऊ शकतो.

संघाच्या सॅलरी पर्समध्येही वाढ

बीसीसीआयने आगामी IPL 2022 साठी नव्या नियमांत संघाची सॅलरी पर्समधील रक्कम ही वाढवली आहे. त्यामुळे संघाकडे खेळाडू विकत घेण्यासाठी 85 कोटी नाहीतर 90 कोटी असणार आहेत. त्यामुळे 10 संघाचा विचार करता एकूण 50 कोटींची बढत करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षात ही रक्कम 90 वरुन 95 कोटी होऊ शकते, 2024 पर्यंततर ही रक्कम 100 कोटी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इतर बातम्या

पाकिस्तानशी भिडण्यापूर्वी भारताचा सामना ‘या’ दोन संघाशी, सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर

राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षकपदाला नकार, वाचा नेमकं कारण काय?

IPL 2021: सनरायजर्स हैद्राबाद वाईट वर्तवणूकीनंतरही डेव्हिड वॉर्नरला संघासोबत खेळायचंय, म्हणाला…

(BCCI Extends the date for purchasing the itt document till october 20 For IPL 2022 Mega Auction)

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.