राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षकपदाला नकार, वाचा नेमकं कारण काय?

भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होणार असल्याच्या चर्चेला मागील काही दिवसांपासून उधाण आलं होतं. पण द्रविडने एका वेगळ्याच कारणासाठी हे पद नाकारलं आहे.

राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षकपदाला नकार, वाचा नेमकं कारण काय?
राहुल द्रविड
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 9:55 PM

मुंबई: आगामी टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बदलणार हे नक्की आहे. रवी शास्त्री यांनी स्वत:हून याबद्दल सांगितलं असून आता नेमकी त्यांची जागा कोण घेणार? याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. पण दरम्यान या जागी राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच नाव सतत चर्चेत होतं. पण त्याने स्वत:हून या पदासाठी नकार दिला असून त्याने याबद्दलचं कारणही स्पष्ट केलं आहे.

राहुल द्रविडने सांगितंल, त्याला ज्यूनियर स्तरावरील खेळाडूंच्या निवडीसाठी आणि त्यांचा खेळ सुधारण्यासाठी काम करायचं आहे. त्यासाठी नॅशनल क्रिकेट अॅकेडमीचा (National Cricket Academy) प्रमुख हे पद योग्य असून त्याने आधीही या पदावर काम केलं आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचा कोच असलेलाय द्रविड कायमस्वरुपी संघाचा मुख्य कोच होईल असे वाटत होते पण यावर आता पडदा पडला आहे.

राहुल द्रविडने तयार केले दमदार खेळाडू

राहुल द्रविडने आतापर्यंत भारतीय संघाला अनेक हिरे दिले आहेत. ज्यूनियर खेळाडूंचं प्रशिक्षण घेताला द्रविडने तयार केलेल्या खेळाडूंमध्ये शुभमन गिल, पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, अर्शदीप सिंग, शिवम मावी, ऋतुराज गायकवाड या सारख्या दमदार खेळाडूंचा समावेश आहे. हे सर्व आयपीएलसह काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय क्रिकेटही गाजवत आहेत.

कोण होणार टीम इंडियाचा हेड कोच?

टीम इंडियाचा हेड कोच होण्यासाठी बरेच दावेदार आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू लांस क्लूजनर यानेही नुकतीच या पदासाठी इच्छा दर्शवली. त्यासह महेला जयवर्धने, अनिल कुंबळे अशीही काही नावं चर्चेत आहेत.

इतर बातम्या

धोनीचा मनाचा मोठेपणा, आगामी विश्वचषकात मानधन न घेता मार्गदर्शन करणार, BCCI ची माहिती

T20 World Cup खेळणाऱ्या भारतीय संघातील 15 पैकी 10 खेळाडू आयपीएल बाहेर, खेळाडूंचा फॉर्म पाहता BCCI चिंतेत

धोनीची फटकेबाजी पाहून छोट्या मुलीच्या डोळ्यात आनंदाश्रू, मॅच संपल्यानंतर माहीकडून चिमुरडीला गोड गिफ्ट

(Rahul dravid refused to be the head coach of team india)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.