BCCI Announced Squad SA : दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टीम इंडियाची घोषणा, तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळे कॅप्टन
BCCI Announced team india squad against south africa : बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली असून तिन्ही संघांमध्ये वेगवेगळ्या खेळडूंची कॅप्टनसीसाठी निवड केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये विश्रांती घेतली आहे.

मुंबई : बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघांमध्ये तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या खेळाडूंची कॅप्टन पदासाठी निवड केली आहे. रोहित शर्मा याला वन डे मालिकेमधून आराम देण्यात आला आहे. वन डे मध्ये के. एल. राहुल तर टी-20 साठी सूर्यकुमार यादव आणि कसोटीसाठी रोहित शर्माच कॅप्टन असणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी बीसीसीयला व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये विश्रांती देण्याची मागणी केली होती. तर मोहम्मद शमी याची ट्रिटमेंट सुरू असल्याने त्याच्या फिटनेसवर त्याचं खेळणं अवलंबून आहे.
वन डे क्रिकेटमधून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दौऱ्यामध्ये के. एल. राहुल याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर कसोटी सामन्यांसाठी रोहित शर्मा कॅप्टन असणार असून संघाच्या उपकर्णधारपदी जसप्रीत बुमराह याची निवड करण्यात आली आहे. टी-२० मध्ये सूर्यकुमार यादव याच्याकडेच संघाची कर्णधारपदी निवड करण्यात आली तर रविंद्र जडेजाकडे संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीय.
Notes 👇👇 · Mr Rohit Sharma and Mr Virat Kohli had requested the Board for a break from the white-ball leg of the tour. · Mr Mohd. Shami is currently undergoing medical treatment and his availability is subject to fitness.#SAvIND
— BCCI (@BCCI) November 30, 2023
बीसीसीआयने जाहीर केलेले संघ
2 कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (C), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, इशान किशन (WK), केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद. शमी*, जसप्रीत बुमराह (VC), प्रसीध कृष्णा.
3 वनडेसाठी भारताचा संघ: रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (C&W), संजू सॅमसन (WK), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.
3 टी-20 सामन्यांसाठी भारताचा संघ: यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (C), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (WK), जितेश शर्मा (WK), रवींद्र जडेजा (VC), वॉशिंग्टन सन , रवी बिश्नोई , कुलदीप यादव , अर्शदीप सिंग , मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.
