Captain | रोहितची कॅप्टनसी काढली, वन डेमध्ये टीम इंडियाला नवा कॅप्टन
Team India ODI New Captain : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या नेतृत्त्वाची धुरा रोहित नाहीतर दुसऱ्या खेळाडूकडे देण्यात दिली आहे. ज्या खेळाडूला संघातून काढून टाकावं असं बोललं जात होतं त्याला आता नेतृत्त्वाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई : वन डे वर्ल्ड कप 2023 नंतर आता टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यावर आहे. या दौऱ्यामध्ये संघाच्या कर्णधारपदी कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हार्दिक पंड्याकडे टी-२० संघाचं कर्णधार कायम ठेवणार की रोहित शर्माकडेच टी-20 मध्येही कॅप्टनी देणार असे प्रश्न चाहत्यांच्या मनात होते. अशातच बीसीसीआयने या दौऱ्यामध्ये रोहित शर्मा नाहीतर दुसऱ्या खेळाडूकडे वन डे कर्णधारपदाची जबाबदारी दिली आली आहे.
रोहित शर्मा याला वन डे क्रिकेटमध्ये विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी के. एल. राहुल याच्याकडे वन डे क्रिकेटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. हार्दिक पंड्या उपलब्ध नसल्यामुळे सूर्यकुमार यादव याच्याकडेच टी-20 कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
India’s squad for 3 ODIs: Ruturaj Gaikwad, Sai Sudharsan, Tilak Varma, Rajat Patidar, Rinku Singh, Shreyas Iyer, KL Rahul (C)(wk), Sanju Samson (wk), Axar Patel, Washington Sundar, Kuldeep Yadav, Yuzvendra Chahal, Mukesh Kumar, Avesh Khan, Arshdeep Singh, Deepak Chahar.#SAvIND
— BCCI (@BCCI) November 30, 2023
कसोटी संघामध्ये अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना स्थान देण्यात आलेलं नाही. युवा खेळाडू श्रेयस अय्यर याने कसोटीमध्ये कमबॅक केलं आहे. बीसीसीआयने अधिकृतपणे याबाबत घोषणा केली आहे. कसोटीमध्ये रोहित शर्मा याच्याकडेच संघाचं कर्णधारपद राहणार असून जसप्रीत बुमराहकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
India’s squad for 2 Tests: Rohit Sharma (C), Shubman Gill, Yashasvi Jaiswal, Virat Kohli, Shreyas Iyer, Ruturaj Gaikwad, Ishan Kishan (wk), KL Rahul (wk), Ravichandran Ashwin, Ravindra Jadeja, Shardul Thakur, Mohd. Siraj, Mukesh Kumar, Mohd. Shami*, Jasprit Bumrah (VC), Prasidh…
— BCCI (@BCCI) November 30, 2023
भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याला 10 तारखेपासून सुरूवात होणार आहे. 10 ते 14 डिसेंबरदरम्यान टी-20 मालिका तर 17 पासून 21 पर्यंत कसोटी आणि वन डे मालिका 26 पासून 7 जानेवारीपर्यंत कसोटी मालिका होणार आहे.
