नॅशनल क्रिकेट अकादमीत नोकरीची संधी, BCCI ने मागवले अर्ज, 10 सप्टेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख

या पदांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर असून वयाची अट 60 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे. BCCI ने त्यांच्या संकेतस्थळावर याबाबतची सर्व माहिती दिली आहे.

नॅशनल क्रिकेट अकादमीत नोकरीची संधी, BCCI ने मागवले अर्ज, 10 सप्टेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख
BCCI

बंगळुरु : नॅशनल क्रिकेट अकादमीत नोकरीची संधी निघाली असून चार पदांसाठी जागा आहे. BCCI ने यासाठी अर्ज मागवले असून अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर आहे. तसंच वयाची अटही 60 वर्षांखालील व्यक्ती इतकीच आहे. BCCI ने अधिकृत संकेतस्थळावर याबाबची सर्व माहिती दिली आहे. नॅशनल क्रिकेट अकादमीत उपलब्ध असणारी पदं आहेत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक. यामध्ये गोलंदाजी प्रशिक्षकात फिरकी गोलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी अशी दोन पद असून एकूण चार पदासांठी नोकरी निघाली आहे.

बीसीसीआयने NCA मधील 11 प्रशिक्षकांचा वार्षिक करार पुन्हा नव्याने करण्यासाठी मनाई केली असता ही सर्व पदं उपलब्ध झाली आहेत. करार न करण्यात आलेल्यांमध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू समाविष्ट होते. ज्यामध्ये ऋषिकेश कानिटकर, रमेश पोवार, सुजीत सोमसुंदर, सुबर्तो बॅनर्जी आणि शिव सुंदर दास यांची नावं होती. यातील शिव सुंदर दास हे भारतीय महिला क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आहेत. तर रमेश पोवार मुख्य प्रशिक्षक आहेत.

BCCI कडून देशांतर्गत स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर

भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) देशांतर्गत क्रिकेटसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये रणजी करंडक स्पर्धेचा 2021-22 चे सत्र 5 जानेवारी ते 20 मार्च दरम्यान खेळले जाईल. कोविड -19 च्या साथीमुळे गेल्या हंगामात रणजी ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले नव्हते. कारण 38 संघांसाठी बायो बबल तयार करण्यात ‘लॉजिस्टिक’ अडथळ्यांना सामोरे जावे लागले असते. बीसीसीआयच्या देशांतर्गत कॅलेंडरच्या या सत्रात रणजी ट्रॉफी खेळली जाईल. पण वरिष्ठ पुरुष क्रिकेटची सुरुवात 27 ऑक्टोबरपासून सय्यद मुश्ताक अली करंडकाने होईल, जी सर्वोत्तम क्रिकेटपटूंची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी इंडियन प्रीमियर लीग नंतर आयोजीत केली जाईल.

इतर बातम्या

इंग्लंड क्रिकेट इतिहासात आजचा दिवस मानला जातो ‘Unlucky’, ‘हे’ आहे त्यामागील कारण

भारतीय खेळाडूंचे हे ‘एडिटेड’ फोटो तुम्ही पाहिले का?, विराटचा फोटो तर पाहाच

VIDEO : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी साजरं केलं रक्षाबंधन, अर्जून तेंडुलकरने दिल्या मराठमोळ्या शुभेच्छा

(BCCI invites applications for batting bowling and fielding coaches at NCA)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI