Sourav Ganguly Update: सौरव गांगुलीची तब्येत ठणठणीत, ऑक्सीजन सपोर्ट हटवले

Sourav Ganguly Update: सौरव गांगुलीची तब्येत ठणठणीत, ऑक्सीजन सपोर्ट हटवले
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची प्रकृती आता स्थिर आहे. आज दुपारी 1 वाजता गांगुलीच्या प्रकृतीबद्दल सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

sanjay patil

|

Jan 03, 2021 | 12:20 PM

कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय (BCCI President) अध्यक्ष सौरव गांगुलीची (Sourav Ganguly) प्रकृती आता स्थिर आहे. गांगुलीला शनिवारी 2 जानेवारीला ह्रदय विकाराचा सौम्य झटका आला होता. यानंतर गांगुलीला कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात (Woodlands Hospital) दाखल करण्यात आले होते. दरम्यान यानंतर गांगुलीवर अॅंजियोप्लास्टी करण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान अनेक ब्लॉकेज काढण्यात आले आहेत. तसेच गांगुलीचा आधीपेक्षा ऑक्सीजनचा स्तर वाढला आहे. यामुळे गांगुलीला देण्यात आलेला ऑक्सिजन सपोर्ट काढण्यात आला आहे. दरम्यान गांगुलीच्या प्रकृतीबाबत पुढील माहिती आज दुपारी (3 जानेवारी) 1 वाजता देण्यात येणार आहे. वुडलॅंड्स रुग्णालयकडून 1 वाजता मेडिकल बुलेटिन घेण्यात (Sourav Ganguly medical bulletin)येणार आहे. याद्वारे गांगुलीच्या प्रकृतीची माहिती दिली जाणार आहे. (bcci president sourav ganguly condition stable oxygen support machine removed)

गांगुली शनिवारी राहत्या घरी वर्कआऊट करत होता. या दरम्यान त्याला छातीत दुखु लागले. यानंतर त्याला ह्रदय विकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर गांगुलीला त्वरित वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल केले गेले. गांगुलीवर उपचार करण्यासाठी एकूण 4 डॉक्टरांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली. गांगुलीवर अॅंजियोप्लास्टी करण्यात आली. या शस्त्रक्रियेत ब्लॉकेज काढण्यात आले.

ऑक्सीजन लेवल 98 वर

गांगुलीच्या ऑक्सीजन लेव्हलमध्ये सुधार झाला आहे. गांगुलीचा ऑक्सीजन लेव्हल 98 इतका झाला आहे. त्यामुळे ऑक्सिजन सपोर्ट काढण्यात आला आहे. दरम्यान आता गांगुलीची तब्येत स्थिर आहे. गांगुलीने रविवारी सकाळी नाश्ता केला. रुग्णालयात गांगुलीसोबत त्याचे कुटुंबीयही सोबत आहेत.

पुढील 2 दिवस रुग्णालयात

गांगुलीला पुढील 2 दिवसांसाठी रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. शनिवारी रात्री गांगुलीची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह आला. शनिवारी रात्री गांगुलीला जेवणात चिकन सूप देण्यात आलं. गांगुलीने शनिवारी चांगली झोप घेतली.

देशभरातून प्रार्थना

प्रकृती स्थिर नसल्याचं माहिती होताच देशभरातून गांगुलीसाठी प्रार्थना करण्यात आली. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने गांगुलीच्या बायकोसोबत फोनद्वारे संवाद साधून चौकशी केली. तसेच लता मंगेशकर यांनीही फोनद्वारे गांगुलीच्या तब्येतीची चौकशी केली.

संबंधित बातम्या :

अँजियोप्लास्टीनंतर सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर, कोरोना चाचणी निगेटिव्ह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा सौरव गांगुलीच्या पत्नीला फोन, सर्वतोपरी मदतीचं आश्वासन

(bcci president sourav ganguly condition stable oxygen support machine removed)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें