Gautam Gambhir : वर्षाला 12 कोटी सॅलरी पण कमी, BCCI-गौतम गंभीर यांच्यात घोडं नेमकं अडलेलं कुठं?

Gautam Gambhir : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अखेर गौतम गंभीर यांची निवड झाली आहे. राहुल द्रविड यांच्यानंतर कोण? या प्रश्नाच उत्तर अखेर मिळालं आहे. T20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने राहुल द्रविड यांना शानदार निरोप दिला. आता गौतम गंभीर यांच्याकडून सुद्धा टीम इंडियाच्या चाहत्यांना अशाच प्रदर्शनाची अपेक्षा असेल.

Gautam Gambhir : वर्षाला 12 कोटी सॅलरी पण कमी, BCCI-गौतम गंभीर यांच्यात घोडं नेमकं अडलेलं कुठं?
Gautam Gambhir
Follow us
| Updated on: Jul 10, 2024 | 12:01 PM

टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यानंतर राहुल द्रविड यांचा हेड कोच म्हणून कार्यकाळ समाप्त झाला. राहुल द्रविड यांच्यानंतर कोण? अशी चर्चा मागच्या महिन्याभरापासून सुरु होती. अखेर या प्रश्नाच उत्तर काल मिळालं. राहुल द्रविड यांच्यानंतर गौतम गंभीर त्यांची जागा घेणार आहेत. काल BCCI कडून गौतम गंभीर यांची टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठी घोषणा करण्यात आली. गौतम गंभीरच या पदासाठी मुख्य दावेदार होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत गंभीर यांना टक्कर देणारा दुसरा कोणी स्पर्धक नव्हताच. मग, तरीही त्यांच्या निवडीला इतका विलंब का झाला?.

गौतम गंभीर यांच्या निवडीची घोषणा व्हायला विलंब झाला, त्यामागे सॅलरी हे कारण होते. सॅलरीच्या मुद्यावरुन बीसीसीआय आणि त्यांच्यामध्ये एकमत होत नव्हतं. गौतम गंभीर यांना राहुल द्रविड यांच्यापेक्षा जास्त सॅलरी मिळेल अशी अपेक्षा आहे. द्रविड यांचं वार्षिक वेतन जवळपास 12 कोटींच्या घरात होतं. त्यामुळे गंभीर यांना किती सॅलरी मिळते, याची उत्सुक्ता आहे.

गौतम गंभीर हेड कोच पदाची जबाबदारी कधी संभाळणार?

गौतम गंभीर यांना त्यांच्या पसंतीचा सपोर्ट स्टाफ निवडण्याची पूर्ण मोकळीक असेल. शुभमन गिल यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. NCA प्रमुख व्ही.व्ही.एस लक्ष्मण सध्या भारताचे अंतरिम कोच आहेत. श्रीलंका टूरपासून गौतम गंभीर हेड कोच पदाची आपली जबाबदारी संभाळतील. टीम इंडिया या महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.

Non Stop LIVE Update
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद.
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका.
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले.
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी.
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार.
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान.
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर.
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड.