IND vs ENG : भारत आणि इंग्लंडमधील अंतिम कसोटीला काही वेळातच सुरुवात, असा आहे मँचेस्टरवरील भारताचा रेकॉर्ड

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील आज अखेरचा सामना आहे. मालिकेत 2-1 ने आघाडीवर असणाऱ्या भारताचा आज सामना होणाऱ्या मँचेस्टर मैदानावरील रेकॉर्डवर एक नजर...

IND vs ENG : भारत आणि इंग्लंडमधील अंतिम कसोटीला काही वेळातच सुरुवात, असा आहे मँचेस्टरवरील भारताचा रेकॉर्ड
भारतीय संघ
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 11:43 AM

मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्याक आज मँचेस्टरच्या (Manchester) ओल़्ड ट्रॅफॉर्ड मैदानात 5वा कसोटी (5th Test) सामना खेळवला जाईल. दरम्यान आधी प्रशिक्षक रवी शास्त्रीनंतर फीजियो योगेश परमार याची कोरोना टेस्ट पॉजिटिव्ह आल्यनंतर शेवटची टेस्ट खेळवण्यापबाबत शंका व्यक्त केली जात होती. पण टी  इंडियाच्या (Team India) सर्व खेळाडूंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याने पाचवी टेस्ट होणार आहे.

हा सामना भारत जिंकल्यास मालिका भारताच्या नावावर होईल आणि इंग्लंड जिंकल्यास मालिका अनिर्णीत सुटू शकते. त्यामुळे आजच्या या निर्णायक सामन्यासाठी इंग्लंड आणि भारत दोन्ही संघ जीवाचं रान करणार आहेत. भारत सध्या मालिकेत 2-1 च्या आघाडीवर आहे. पण आजची मँचेस्टरवरील कसोटी जिंकण भारतासाठी सोपं नसून या मैदानावरील भारताचा रेकॉर्ड फारच खराब आहे.

मागील 9 कसोटी सामन्यात टीम इंडिया

भारत आणि इंग्लंड य़ांच्यात होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्याच्या मँचेस्टर मैदानात भारत आजवर एकही कसोटी सामना जिंकू शकलेला नाही. मँचेस्टरच्या या ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात भारताने आजवर 9 कसोटी सामने खेळले आहेत. या 9 सामन्यातील 4 सामन्यांत भारताचा पराभव झाला असून इतर 5 सामने अनिर्णीत सुटले आहेत. नुकतीच चौथ्या टेस्टमध्ये भारताने ओव्हलच्या मैदानावर 50 वर्षानंतर पहिला विजय मिळवला. तशीच कामगिरी मँचेस्टरमध्येही करावी अशी इच्छा प्रत्येक भारतीय व्यक्त करत आहे.

पाचव्या कसोटीला दिग्गज फलंदाज मुकण्याची शक्यता

भारताचा दिग्गज दौऱ्यातील सर्वात यशस्वी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे चौथ्या सामन्यात क्षेत्ररक्षण न करता तंबूत विश्रांती करत होता. रोहितच्या गुडघ्याला थोडी दुखापत असल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दुखापत अजून वाढू नये यासाठी रोहित विश्रांती घेत आहे. तसंच त्याच्या पायाचा X-Ray ही काढण्यात आला असून त्याचा रिपोर्ट आल्यानंतर नेमकी दुखापत किती आहे? हे कळणार आहे. त्यानंतरच रोहित मॅन्चेस्टरमध्ये होणाऱ्या (Manchester Test) पाचव्या कसोटी सामन्यात खेळेल का? हे स्पष्ट होईल.

इतर बातम्या

Ind vs Eng : गणपती बाप्पा पावला, भारताच्या सर्व खेळाडूंचे अहवाल कोरोना निगेटिव्ह, आजपासून पाचव्या कसोटीचा थरार

T 20 World Cup मध्ये धोनी विरुद्ध रवी शास्त्री वाद रंगला तर?, माजी क्रिकेटपटूने व्यक्त केली भिती

T20 world Cup 2021: टी-20 विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, दोन दिग्गज खेळाडूंना डच्चू

(Before india vs england 5th test starts know record of india at manchester)

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.