Ben Stokes : अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतोय, बेन स्टोक्सच्या निर्णयाने इंग्लंडला मोठा धक्का

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने (Ben Stokes) अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) याबाबतची माहिती दिली.

Ben Stokes : अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतोय, बेन स्टोक्सच्या निर्णयाने इंग्लंडला मोठा धक्का
Follow us
| Updated on: Jul 31, 2021 | 8:18 AM

लंडन : क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England test series) यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होण्यासाठी आता केवळ 4 दिवस राहिले आहेत. मात्र त्याआधीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. कारण इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने (Ben Stokes) अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) याबाबतची माहिती दिली. येत्या 4 ऑगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे.

बेन स्टोक्सने अचानक क्रिकेट मालिकेतून नाव माघार तर घेतलंच, पण अनिश्चित काळासाठी ब्रेक घेत असल्याचं त्याने म्हटलं आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात तर्कवितर्क लढवले जात आहेत. मानसिक स्वास्थ्य आणि बोटाला झालेली दुखापत यामुळेही स्टोक्सने क्रिकेटमधून विश्रांती घेतल्याची चर्चा आहे. यंदा आयपीएल 2021 दरम्यान स्टोक्सच्या बोटाला दुखापत झाली होती. कॅच घेताना त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झालं होतं.

दरम्या, इंग्लंड बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, बेन स्टोक्सने भारताविरुद्ध पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेतून आपलं नाव मागे घेतलं आहे. आपल्या मानसिक आरोग्याची काळजी तो घेत आहे. शिवाय त्याच्या बोटालाही दुखापत झाली आहे. आम्ही त्याच्या या निर्णयाचा आदर करतो”

क्रेग ओव्हरटनला संधी

दरम्यान, भारताविरुद्ध होणाऱ्या पहिल्या दोन कसोटी मालिकेसाठी इंग्लंडने बेन स्टोक्सच्या जागी क्रेग ओव्हरटनचा संघात समावेश केला आहे. ज्या 17 जणांचा संघ जाहीर केला होता, त्यामध्ये स्टोक्सचा समावेश होता. आता त्याच्या जागी क्रेग ओव्हटरनचा समावेश करण्यात आला आहे.

बेन स्टोक्सची कारकीर्द

  • बेन स्टोक्स हा सध्याच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे.
  • स्टोक्सने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडिलेटमध्ये कसोटी पदार्पण केलं.
  • स्टोक्सने आतापर्यंत 71 कसोटी सामन्यात 10 शतकं ठोकली आहेत.
  • त्याच्या नावावर कसोटीत 4631 धावा आहेत
  • कसोटीत स्टोक्सने 163 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये 4 वेळा 5 विकेट्सचा समावेश आहे.

वन डे आणि T20 कारकीर्द

  • स्टोक्सने 2011 मध्ये आयर्लंडविरुद्ध वन डे पदार्पण केलं होतं, तर त्याच वर्षी वेस्ट इंडीजविरुद्ध तो टी 20 च्या मैदानात उतरला.
  • वन डेमध्ये त्याने 101 सामन्यात 2871 धावा ठोकल्या. यामध्ये 3 शतकं आणि 74 विकेट्सही घेतल्या आहेत.
  • 2019 मध्ये इंग्लंडने जिंकलेल्या वन डे विश्वचषकात स्टोक्सने जबरदस्त खेळी केली होती.
  • बेन स्टोक्स 34 टी 20 सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने 19 विकेट घेतल्या आहेत. तर बॅटिंग करताना 442 धावा ठोकल्या.
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.