Video : बेन स्टोक्स कळवळला, सिराजच्या चेंडू अशा ठिकाणा लागला की…

भारताची स्थिती चौथ्या कसोटी सामन्यात नाजूक आहे. इंग्लंडने तिसऱ्या दिवशी सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. असं असताना भारतीय विकेट मिळवण्यासाठी धडपड करत आहे. असं असताना सिराजच्या एका चेंडूवर बेन स्टोक्स कळवळला.

Video : बेन स्टोक्स कळवळला, सिराजच्या चेंडू अशा ठिकाणा लागला की...
बेन स्टोक्स कळवळला, सिराजच्या चेंडू अशा ठिकाणा लागला की...
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 25, 2025 | 8:40 PM

भारत इंग्लंड चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने मजबूत पकड मिळवली आहे. पण तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्ससोबत असं काही घडलं की कळवळला. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर त्याला दुखापत झाली. मांडीवर इतका जबरदस्त चेंडू आदळला की त्या वेदना असह्य झाल्या. मोहम्मद सिराजचा चेंडू टप्पा पडल्यानंतर आत आला आणि त्याला कळलंच नाही. चेंडू सरळ त्याच्या एब्डमन गार्डवर आदळला. त्यामुळे त्याला असह्य वेदना झाल्या. बेन स्टोक्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, बेन स्टोक्सला इतकं लागूनही मोहम्मद सिराजने त्याच्यावर दया दाखवली नाही. त्यानंतर स्टोक्सच्या डोळ्यात डोळे घालून पाहीलं. त्यानंतर तो रनअपवर गेला. सिराजच्या चेंडूची छाप त्याच्या ट्रॅकवर स्पष्ट दिसत होता. पण त्यानंतर बेन स्टोक्स पुन्हा फलंदाजीसाठी तयार झाला.

बेन स्टोक्सने पहिल्या डावात जबरदस्त गोलंदाजी करताना पाच विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे भारताची धावसंख्या 358 धावांवर थांबली. बेन स्टोक्सने कसोटीत पाचव्यांदा पाच विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. बेन स्टोक्सने आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पाच विकेट घेतल्या. यापूर्वी 2017 मध्ये त्याने अशी कामगिरी केली होती. बेन स्टोक्सने चहापानाच्या ब्रेकपर्यंत 36 धावांची खेळी केली आहे. तसेच जो रूट 121 धावांवर खेळत आहे. इंग्लंडकडे 75 धावांची आघाडी असून भारतावर पराभवाचं सावट गडद होत चाललं आहे.

जो रूटने या कसोटी सामन्यातही भारतीय गोलंदाजांची हवा काढली. बेझबॉल म्हणून ओरडणाऱ्या भारतीय गोलंदाजांना इंगा दाखवला आहे. जो रूटचं 2021 नंतर कसोटीतील हे 21वं शतक आहे. यापूर्वी लॉर्ड्स कसोटीतही त्याने भारताविरुद्ध शतक ठोकलं होतं. जो रूटचं हे 38वा कसोटी शतक आहे. या मालिकेत भारताविरुद्ध दुसरं शतक आहे. जो रूटने भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केली आहे. त्याने भारताविरुद्ध 1900 हून अधिक धावा केल्या आहेत.