ENG vs IND : कॅप्टन शुबमन गिल-बेन स्टोक्स पुन्हा आमनेसामने, आयसीसीची घोषणा
Shubman Gill vs Ben Stokes : इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील कसोटी मालिकेनंतर आता पुन्हा एकदा दोन्ही संघांचे कर्णधार बेन स्टोक्स आणि शुबमन गिल हे आमनेसामने आले आहेत. आयसीसीने याबाबतची घोषणा केली आहे.

भारतीय संघाने 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवत इंग्लंड दौऱ्याचा शेवट गोड केला. भारतीय संघ तिसऱ्या सामन्यानंतर मालिकेत 1-2 ने पिछाडीवर होता. मात्र चौथा सामना बरोबरीत सोडवल्यानंतर भारताने पाचव्या सामन्यात इंग्लंडवर 6 धावांनी सनसनाटी विजय मिळवत इंग्लंडला मालिका जिंकण्यापासून रोखलं. भारताने कर्णधार शुबमन गिल याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली. शुबमनची कर्णधार म्हणून ही पहिलीच कसोटी मालिका होती. शुबमनने या मालिकेत नेतृत्व क्षमता दाखवून दिली. इतकंच नाही तर शुबमनने फलंदाज म्हणून ऐतिहासिक आणि विक्रमी कामगिरी केली.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याला दुखापतीमुळे पाचव्या सामन्यात खेळता आलं नाही. मात्र स्टोक्सने पहिल्या 4 सामन्यांमध्ये बॅटिंग आणि बॉलिंगसह निर्णायक योगदान दिलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा शुबमन गिल विरुद्ध बेन स्टोक्स आमनेसामने आले आहेत. आयसीसीने याबाबतची घोषणा केली आहे.
आयसीसीने जुलै महिन्यातील’प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकन जाहीर केली आहेत. आयसीसीने 3 खेळाडूंना नामांकन दिलं आहे. आयसीसीने शुबमन गिल, बेन स्टोक्स आणि दक्षिण आफ्रिकेच्या वियान मुल्डर या तिघांना नामांकन दिलं आहे. आयसीसी एका महिन्यात तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 3 खेळाडूंची निवड करते. त्यानंतर आयसीसी कामगिरी क्रिकेट चाहत्यांनी केलेल्या मतदानाच्या जोरावर तिघांपैकी पुरस्कार विजेता निश्चित करते.
आयसीसीने स्टोक्स आणि शुबमन व्यतिरिक्त वियान मल्डर याला संधी दिलीय. मात्र या पुरस्कारासाठी स्टोक्स आणि शुबमन यांच्यात प्रमुख लढत असणार आहे. या दोघांनी नुक्त्याच झालेल्या इंग्लंड-इंडिया कसोटी मालिकेत अप्रतिम कामगिरी केली.
शुबमनची कामगिरी
शुबमनने जुलै महिन्यात इंग्लंड विरूद्धच्या 3 कसोटी सामन्यांमध्ये 94.50 च्या सरासरीने 567 धावा केल्या. शुबमनने दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 269 तर दुसर्या डावात 161 धावा केल्या. तसेच शुबमनने चौथ्या कसोटीत 103 धावा केल्या. शुबमनने आतापर्यंत एकूण 3 वेळा आयसीसीचा हा पुरस्कार जिंकला आहे. त्यामुळे शुबमन चौथ्यांदा हा पुरस्कार जिंकणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आणि ऑलराउंडर वियान मुल्डर याने झिंबाब्वे विरुद्ध 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 265.50 च्या सरासरीने 531 धावा केल्या. वियानने पहिल्या सामन्यात 147 तर दुसऱ्या सामन्यात नाबाद 367 धावांची ऐतिहासिक खेळी केली. तसेच वियानने 7 विकेट्सही घेतल्या.
तिघांना नामांकन मात्र स्टोक्स-गिलमध्ये चुरस
A Protea and an English all-rounder lock horns with an in-form India batter for the July ICC Men’s Player of the Month honours 👊https://t.co/1YLjnbwf50
— ICC (@ICC) August 6, 2025
बेन स्टोक्सची कामगिरी
बेन स्टोक्स याने टीम इंडिया विरुद्ध जुलै महिन्यातील पहिल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये 50.20 च्या सरासरीने 251 धावा केल्या. तसेच 12 विकेट्सही घेतल्या. आता आयसीसी या तिघांपैकी कुणाची निवड करते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
