Ravindra Jadeja : रवींद्र जडेजा याचा ‘पंच’, ऑस्ट्रेलियाला फिरकीवर नाचवलं

रवींद्र जडेजा याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या टेस्ट सीरिजमधून कमबॅक केलं. जडेजाने या पहिल्याच कसोटीतील पहिल्याच डावात धमाका केला. जडेजाने कांगारुंना फिरकीवर नाचवत 5 विकेट्स घेतल्या.

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजा याचा 'पंच', ऑस्ट्रेलियाला फिरकीवर नाचवलं
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 3:43 PM

नागपूर : टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने शानदार एन्ट्री केली आहे. जडेजाने बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्याच कसोटी सामन्यात कांगारुंना जेरीस आणलं. जडेजा पहिल्या डावात 5 विकेट्स घेत अर्धी टीम माघारी पाठवली. तसेच जडेजाने मोठा रेकॉर्ड ब्रेक केला. जडेजाच्या या फिरकीच्या जादूवर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव हा 63.5 ओव्हरमध्ये 177 धावांवर आटोपला. जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. जडेजाने आपल्या एकूण 22 ओव्हरमध्ये 47 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. जडेजाने या 22 पैकी 8 ओव्हर मेडन टाकल्या.

जडेजाने मार्नल लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब आणि टॉड मर्फी या पाच जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेनने सर्वाधिक 49 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने 37 रन्सचं योगदान दिलं. विकेटकीपर एलेक्स कॅरीने 36 रन्स केल्या. तर पीटर हँड्सकॉम्बने 31 धावा जोडल्या.

अश्विनच्या 450 विकेट्स

जडेजानंतर सर्वाधिक विकेट्स आर अश्विनने घेतल्या. अश्विनने 3 विकेट्स घेतल्या. अश्विनने एलेक्स कॅरीला आऊट करत मोठा कारनामा केला.

हे सुद्धा वाचा

अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 450 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. अश्विन याने 89 व्या सामन्यात ही कामगिरी केली. अश्विन यासह टीम इंडियाकडून सर्वात कमी 89 सामन्यांमध्ये 450 विकेट्स घेतल्या. यासह अश्विनने 18 वर्षांपूर्वीचा टीम इंडियाच्या अनिल कुंबळे याचा रेकॉर्ड ब्रेक केला. कुंबळे याने आजपासून 18 वर्षांपूर्वी 2005 मध्ये 93 सामन्यांमध्ये 450 विकेट्स घेतल्या होत्या.

सूर्यकुमार आणि भरतचं कसोटी पदार्पण

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीतून टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादव आणि केएस भरत या दोघांनी पदार्पण केलं आहे. सूर्यकुमार टीम इंडियाकडून तिन्ही फॉर्मेटमध्ये वयाच्या तिशीनंतर पदार्पण करणारा खेळाडू ठरला आहे.

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.