AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: पहिल्या कसोटीआधी पालघरच्या शार्दुल ठाकूरचा इंग्लंडला सूचक इशारा

यजमान संघालाच एजबॅस्टन कसोटीमध्ये विजयासाठी पसंती दिली जात आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंड शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) इंग्लंडला सूचक इशारा दिला आहे.

IND vs ENG: पहिल्या कसोटीआधी पालघरच्या शार्दुल ठाकूरचा इंग्लंडला सूचक इशारा
shardul thakurImage Credit source: AFP
| Updated on: Jun 30, 2022 | 3:00 PM
Share

मुंबई: भारत आणि इंग्लंडमध्ये पाचवा कसोटी सामना (IND vs ENG Test Match) शुक्रवारपासून बर्मिंघम मध्ये सुरु होणार आहे. सीरीज मध्ये भारत सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. भारताकडे 15 वर्षानंतर मालिका विजयाची संधी आहे. भारतासाठी हा कसोटी सामना सोपा नसेल. सध्या इंग्लंडचा संघ जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. न्यूझीलंडला त्यांनी 3-0 अशी धुळ (ENG vs NZ) चारली आहे. सध्या ते वेगळ्याच प्रकारच आक्रमक क्रिकेट खेळतायत. त्यामुळे यजमान संघालाच एजबॅस्टन कसोटीमध्ये विजयासाठी पसंती दिली जात आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंड शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) इंग्लंडला सूचक इशारा दिला आहे. टीम इंडियाची गोलंदाजी योग्य मार्गावर असून टीम मधील प्रत्येक गोलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आहे, असं शार्दुल ठाकूरने म्हटलय.

आमचे गोलंदाज धोकादायक

“आमच्या वेगवान गोलंदाजी युनिटला सूर गवसलेला आहे. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव ज्याला कोणाला संधी मिळते, ते चांगलं प्रदर्शन करतायत. हे सर्वचजण नव्या चेंडूने गोलंदाजी करतात. कधी कधी ते सुरुवातीच्या स्पेल मध्ये 2-3 विकेट घेतात. त्यामुळे नंतर मला गोलंदाजीची संधी मिळते. त्यामुळे मला बहुतेकदा सेट फलंदाजांना गोलंदाजी करण्याची संधी मिळते. मी त्यांना आऊट केलं, तर एक वेगळा परिणाम होतो. मला मधल्या षटकात गोलंदाजी करायला आवडते. कारण तिथे तुम्हाला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळते” असं शार्दुल म्हणाला.

पारस म्हांब्रेबद्दल शार्दुल म्हणाला….

शार्दुल ठाकूरने नवीन गोलंदाजी कोच पारस म्हांब्रे यांच कौतुक केलं. “मी पारस म्हांब्रे यांना बऱ्याच आधीपासून ओळखतो. आम्ही फक्त गोलंदाजीबद्दलच बोलत नाही. काही वेळा मस्करीही करतो. माझ्या मते टिम इंडियाचं गोलंदाजी युनिट एका योग्य मार्गावर आहे” असं तो म्हणाला.

शार्दुलला इंग्लंडमध्ये गोलंदाजी का आवडते?

इंग्लंड मध्ये मला गोलंदाजी करायला खूप आवडते, असं शार्दुलने सांगितलं. “इंग्लंड मधल्या खेळपट्टया या गोलंदाजांसाठी स्वर्गासारख्या आहेत. इथे वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळते. तुम्ही एकाच स्पेल मध्ये अनेक विकेट घेऊ शकता. इंग्लंड मध्ये गोलंदाजी करण्याची एक वेगळीच मजा आहे. कारण चेंडू इथे सतत स्विंग होत असतो” असं शार्दुल ठाकूर म्हणाला. मागच्यावर्षी ओव्हल कसोटीत शार्दुलने दोन्ही डावात अर्धशतक झळकावलं होतं.

सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.