T20I World Cup 2026 : टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत श्रेयसची निवड, आयसीसीची घोषणा
Icc T20i World Cup 2026 Canada Squad : भारतात होणाऱ्या 10 व्या आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी कॅनडा क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात बहुतांश मुळ भारतीय खेळाडू आहेत.

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक वर्षांनंतर भारताला आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाच मान मिळाला आहे. तसेच शेजारी श्रीलंका सहयजमान आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. या 20 संघांची विभागणी 5-5 नुसार 4 गटात करण्यात आली आहे. स्पर्धेतील सलामीचा सामना हा 7 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. तर अंतिम सामन्याचा थरार हा 8 मार्चला रंगणार आहे. आतापर्यंत या स्पर्धेसाठी अनेक संघ जाहीर करण्यात आले आहेत. त्यानंतर आता आणखी एका संघाची घोषणा करण्यात आली आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान 14 जानेवारीला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय कॅनडा संघाची घोषणा करण्यात आली आहे. कॅनडाची टी 20I वर्ल्ड कप स्पर्धत खेळण्याची यंदाची ही एकूण आणि सलग दुसरी वेळ आहे. कॅनडाने 2024 साली टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण केलं होतं. कॅनडाने यंदाही पात्रता फेरीतून टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेचं तिकीट मिळवलं आहे. कॅनडा टीम अमेरिका रिजनल स्पर्धेतून वर्ल्ड कपसाठी पात्र ठरली. कॅनडाने या पात्रता फेरीतील सर्वच्या सर्व 6 सामने जिंकले होते. आयसीसीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
कॅनडाचा कॅप्टन कोण?
कॅनडा क्रिकेट बोर्डाने दिलप्रीत बाजवा याला टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधार केलं आहे. दिलप्रीत हा मुळ भारतीय आहे. तसेच या कॅनडाच्या संघात बहुतांश खेळाडू हे भारतीय आहेत. विशेष म्हणजे कॅनडाच्या या संघात भारतीय संघातील खेळाडूंच्या नावाचे क्रिकेटपटू आहेत. कॅनडा टीममध्ये श्रेयस मोव्वा आणि शिवम शर्मा हे खेळाडू आहेत. तर वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात बीसीसीआयने शिवम दुबे याचा समावेश केला आहे.
टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेसाठी कॅनडा टीमची घोषणा
Canada have announced squad for their second Men’s #T20WorldCup appearance 👊
More 👇https://t.co/9ldHBdwiSn
— ICC (@ICC) January 14, 2026
तसेच तिलक वर्मा याला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागल्यास त्याच्या जागी श्रेयस अय्यर याला वर्ल्ड कपसाठी संधी मिळू शकते. तिलकला दुखापतीमुळे न्यूझीलंड विरूद्धच्या 5 पैकी 3 टी 20I सामन्यांना मुकावं लागलं आहे. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वनडेनंतर 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे.
कॅनडा कोणत्या ग्रुपमध्ये?
कॅनडाचा डी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. कॅनडासह या ग्रुपमध्ये अफगाणिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि यूएईचा समावेश आहे.
कॅनडाचं वेळापत्रक
विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 9 फेब्रुवारी
विरुद्ध यूएई, 13 फेब्रुवारी
विरुद्ध न्यूझीलंड, 17 फेब्रुवारी
विरुद्ध अफगाणिस्तान, 19 फेब्रुवारी
आयसीसी टी 2OI वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी टीम कॅनडा : दिलप्रीत बाजवा (कर्णधार), अजयवीर हुंदल, अंश पटेल, दिलोन हेलिगर, हर्ष ठाकेर, जसकरणदीप बुट्टर, कलीम सना, कंवरपाल तथगुर, नवनीत धालीवाल, निकोलस किर्तन, रविंदरपाल सिंग, साद बिन जफर, शिवम शर्मा, श्रेयस मोव्वा आणि युवराज साम्रा.