AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी हरमनप्रीत कौरने व्यक्त केली चिंता, आमच्याकडे एक सामना असून…

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अखेर भारताने उपांत्य फेरी गाठली आहे. आता टीम इंडिया जेतेपदापासून दोन विजय दूर आहे. असं असताना एका सामन्याची संधी असल्याचं कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली आहे. असं का ते जाणून घ्या.

उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी हरमनप्रीत कौरने व्यक्त केली चिंता, आमच्याकडे एक सामना असून...
उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी हरमनप्रीत कौरने व्यक्त केली चिंता, आमच्याकडे एक सामना असून...Image Credit source: BCCI Women Twitter
| Updated on: Oct 24, 2025 | 4:16 PM
Share

न्यूझीलंडविरुद्धचा महत्त्वाचा सामना भारताने 53 धावांनी जिंकला आणि उपांत्य फेरीत जागा पक्की केली. पावसामुळे या सामन्यात व्यत्यय आला आणि भारताने 49 षटकं खेळत 3 गडी गमवून 340 धावा केल्या. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार टार्गेट निश्चित करण्यात आलं आहे. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 44 षटकात 325 धावांचं आव्हान दिलं गेलं. न्यूझीलंडने 44 षटकात 8 गडी गमवून 271 धावा केल्या. भारताने हा सामना 53 धावांनी जिंकला असला तर न्यूझीलंडने कडवी झुंज दिली. न्यूझीलंडने आक्रमक खेळ दाखवत भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. जर हा सामना 50 षटकांचा असता तर कदाचित न्यूझीलंडची रणनिती प्रभावी ठरली असती असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. कारण भारताची गोलंदाजी या स्पर्धेत काही प्रभावी ठरलेली नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 331 धावा करूनही भारताने हा सामना 49 षटकातच गमावला होता. त्यामुळे भारताची सुमार गोलंदाजी पाहून कर्णधार हरमनप्रीत कौरची चिंता वाढली आहे.

कर्णधार हरमनप्रीत कौर सामन्यानंतर म्हणाली की, ‘मला वाटते की आम्ही फलंदाजी करताना खूप चांगले करत आहोत. पण गोलंदाजी ही अशी गोष्ट आहे जी मला वैयक्तिकरित्या वाटते की आम्हाला स्वतःला खरोखर मजबूत ठेवावे लागेल. आमच्याकडे आणखी एक सामना आहे जिथे आम्ही ती गोष्ट देखील पार करू शकतो. आशा आहे की, गोलंदाजी युनिट म्हणून देखील, आम्ही एकत्र येऊन एक चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करू.’ हरमनप्रीत कौरची चिंता योग्यच आहे. कारण फलंदाजांनी चांगली कामगिरी केली तर गोलंदाजांना त्या धावा रोखता येणं आवश्यक आहे. अन्यथा जेतेपदाचं स्वप्न पूर्ण करणं कठीण आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील भारताचा शेवटचा सामना बांगलादेशशी होणार आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजीकडे लक्ष असणार आहे. गोलंदाजांना त्याच्या रणनितीत सुधारणा करण्याची ही शेवटची वेळ असणार आहे. कारण उपांत्य आणि अंतिम सामन्यात अशी चूक करणं परवडणारं नाही. उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. या दोन्ही संघांचा साखळी फेरीत शेवटचा सामना 25 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघासोबत भारताची उपात्य फेरीत लढत होणार आहे. भारताचा उपांत्य फेरीचा सामना 29 ऑक्टोबरला होणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...