CT 2025 : रोहित शर्माने पाच फिरकीपटूंबाबत सामन्याच्या एक दिवस आधीच काय ते स्पष्ट केलं, म्हणाला..
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील भारताचा पहिला सामना बांगलादेशशी होणार आहे. या सामन्यावर भारताचं पुढचं गणित अवलंबून आहे. हा सामना जिंकला तर भारताचं उपांत्य फेरीचं गणित सुटणार आहे. या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा याने पत्रकार परिषदेत प्रश्नांना उत्तर दिली. खासकरून पाच फिरकीपटूंबाबत त्याने आपलं मत मांडलं.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगून भारतीय संघ दुबईत दाखल झाला आहे. टी20 वर्ल्डकपनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात आणखी एक आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा टीम इंडियाचा मानस आहे. पण टीम इंडियाचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराह या स्पर्धेला मुकल्याने गणित बिघडलं आहे. पण असं असलं तरी भारतीय ताफ्यात चांगले गोलंदाज आहेत. खासकरून दुबईच्या खेळपट्टीचा अंदाज घेत संघात पाच फिरकीपटू आहेत. त्यामुळे टीम इंडिया या स्पर्धेत चांगल्या स्थिती आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना बांगलादेशशी होणार आहे. खरं तर हा करो या मरो असाच सामना आहे. कारण उपांत्य फेरी गाठायची तर दोन सामने जिंकणं भाग आहे. त्यात बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकलो तर उपांत्य फेरीचं गणित सोपं होईल. अन्यथा भारताचा पुढचा प्रवास खूपच कठीण होईल. त्यामुळे या सामन्यावर भारताचं पुढचं काय ते ठरणार आहे. असं असताना या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेला सामोरं गेला आणि प्रश्नांना उत्तरं दिली.
कर्णधार रोहित शर्माने यावेळ स्पष्ट केलं की, चॅम्पियन्स ट्रॉफी आमच्यासाठी खूप महत्त्वाची स्पर्धा आहे. त्यानंतर त्याने इतर प्रश्नांना हात घातला. पाच फिरकीपटूंबाबत गेल्या काही दिवसात टीका होत आहे. त्यावर व्यक्त होत रोहित शर्मा म्हणाला की, ‘मी पाच फिरकीपटू असं पाहात नाही. कारण त्यात फक्त दोनच फिरकीपटू आहेत. तर तर तिघं हे अष्टपैलू आहेत. त्यांच्यामुळे संघ मजबूत स्थितीत येतो.’ दुसरीकडे, रोहित शर्माने उपकर्णधार शुबमन गिलचंही कौतुक केलं. ‘शुबमन गिल हा क्लास प्लेयर आहे. त्याचे आकडे बरंच काही सांगतात. त्यामुळे त्याला उपकर्णधारपद दिलं आहे हे विसरून चालणार नाही.’
भारत आणि बांग्लादेश संघाचे खेळाडू
बांगलादेश संघ: सौम्या सरकार, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), जाकेर अली (विकेटकीपर), मुशफिकुर रहीम, महमुदुल्ला, मेहिदी हसन मिराझ, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब, नाहिद राणा, मुस्तफिजुर रहमान, तौहिद हृदोय, रिशाद हुसैन, परवेझ इमोन, नसुम अहमद.
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर.