IND vs NZ 2025 Final : नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्माने व्यक्त केलं असं मत, म्हणाला…
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि कर्णधार रोहित शर्माचं नशिब पुन्हा एकदा फुटकं निघालं.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रोहित शर्माचं नशिब टॉरसच्या बाबतीत कमनशिबी निघालं आहे. या स्पर्धेतील पाचही सामन्यात रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल गमावला आहे. पण आतापर्यंत झालेल्या चार सामन्यात रोहित शर्माचं विजयाचं गणित मात्र पथ्यावर पडलं आहे.नाणेफेक गमावली तरी रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. त्यामुळे आता अंतिम सामन्यातही तशीच अपेक्षा आहे. दुसरीकडे, रोहित शर्माच्या नावावर नाणेफेक गमवण्याचा विक्रम प्रस्थापित झाला आहे. रोहित शर्माने शेवटचा नाणेफेकीचा कौल वनडे वर्ल्डकप २०२३ मध्ये उपांत्य फेरीत जिंकला होता. त्यानंतर आतापर्यंत नाणेफेक गमवत आहे. रोहित शर्माने कर्णधार सलग नाणेफेक गमवण्याची ही १२ वी वेळ आहे. तसेच टीम इंडियाने सलग १५व्यांदा नाणेफेकीचा कौल गमावला आहे. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर आपलं मत व्यक्त केलं.
‘आम्ही इथे बरेचदा खेळलो आहोत, प्रथम फलंदाजी केली आणि प्रथम गोलंदाजी केली, दुसऱ्यांदा फलंदाजी करायला हरकत नाही. त्यात फारसा बदल झालेला नाही, आम्ही पाठलाग केला आणि जिंकलोही. त्यामुळे तुम्हाला खूप आत्मविश्वास मिळतो, नाणेफेक खेळापासून दूर जाते. दिवसाच्या शेवटी, तुम्हाला किती चांगले खेळला आहे हे महत्त्वाचे आहे. ड्रेसिंग रूममध्ये आम्ही टॉसची काळजी करू नये आणि फक्त चांगले खेळावे याबद्दल बोललो होतो, तेच आम्ही केले आहे आणि आज आम्हालाही करायचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून न्यूझीलंड एक खूप चांगला संघ आहे, ते आयसीसी स्पर्धांमध्ये चांगले क्रिकेट खेळतात. आमच्यासाठी आव्हान आता त्यांच्याविरुद्ध चांगले खेळणे आहे. आम्ही तोच संघ घेऊन मैदानात उतरणार आहोत.’, असं कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, विल्यम ओरोर्क, नॅथन स्मिथ.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
