AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्या निधनानंतर क्रिकेटविश्वातून शोकसंदेश, सचिन तेंडुलकरने व्यक्त केल्या भावना

महाराष्ट्राच्या राजकारणातले प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनाने शोककळा पसरली आहे. क्रिकेटविश्वातही त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर क्रिकेटविश्वातून शोकसंदेश, सचिन तेंडुलकरने व्यक्त केल्या भावना
अजित पवार यांच्या निधनानंतर क्रिकेटविश्वातून शोकसंदेश, सचिन तेंडुलकरने व्यक्त केल्या भावनाImage Credit source: PTI
| Updated on: Jan 28, 2026 | 4:32 PM
Share

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने राज्यातील जनतेला धक्का बसला आहे. अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी कानावर पडल्याने अनेकांना विश्वासच बसला नाही. पण दुर्दैवाने ही बातमी खरी ठरली. महाराष्ट्राच्या राजकारणावर आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पीटीआयच्या वृत्तानुसार, बुधवारी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी त्यांचं विमान कोसळलं. या दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील सर्व लोकांना मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. राजकीयच नाही तर क्रीडा जगतातही शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरपासून अजिंक्य राहणेपर्यंत भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरने खूपच दु:खद बातमी असल्याचं सांगितलं. त्याने त्याच्या सोशल मीडियावर आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. “महाराष्ट्राने एक महान आणि कष्टाळू नेता गमावला आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाप्रती माझी संवेदना. ओम शांती.”, अशा भावान सचिन तेंडुलकरने व्यक्त केल्या.

सचिन तेंडुलकरसारख्याच भावना इतर क्रिकेटपटूंच्या देखील आहेत. भारताचा माजी कर्णधार आणि मुंबईकर क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनीही अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. अजिंक्य रहाणने लिहिलं की, “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला खूप दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत.”

माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि लिहिले की, विमान अपघातात त्यांच्या निधनाची बातमी हृदयद्रावक होती. ते एक मेहनती नेते होते. युसूफ पठाण यांच्याप्रमाणेच तेलंगणा सरकारमधील विद्यमान मंत्री आणि भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनीही अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...