IPL वर पुन्हा कोरोनाचे ग्रहण, चिल्ली-चैन्नई मॅचच्या आधी दिल्लीचा नेटबॉलर कोरोना पॉझटिव्ह, दोन क्रिकेटर्सना केले क्वारंटाईन

दिल्ली कॅपिटल्सच्या टीमसोबत असलेला एका नेटबॉलर कोरोना संक्रमिती झआला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर हा क्रिकेटर ज्या प्लेअरसोबत हॉटेलच्या खोलीत राहत होता, त्या क्रिकेटरलाही क्वरंटाईन करण्यात आले आहे. आजची मॅच धरुन अद्याप दिल्लीला चार मॅचेस खेळायच्या आहेत.

IPL वर पुन्हा कोरोनाचे ग्रहण, चिल्ली-चैन्नई मॅचच्या आधी दिल्लीचा नेटबॉलर कोरोना पॉझटिव्ह, दोन क्रिकेटर्सना केले क्वारंटाईन
IPL covid delhiImage Credit source: social media
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 2:16 PM

मुंबई – IPL2022 दिल्ली कॅपिटल्स (DC)आणि चैन्नई सुपर किंग्ज (CSK) या मॅचच्या आधी दिल्लीचा एक क्रिकेटर कोरोना (Covid)संक्रमित असल्याचे समोर आले आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या टीमसोबत असलेला एका नेटबॉलर कोरोना संक्रमिती झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर हा क्रिकेटर ज्या प्लेअरसोबत हॉटेलच्या खोलीत राहत होता, त्या क्रिकेटरलाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. आजची मॅच धरुन अद्याप दिल्लीला चार मॅचेस खेळायच्या आहेत. मात्र अद्याप याबबत आयपीएल आणि दिल्ली कॅपिटल्सच्या वतीने अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

या सीझनमध्ये यापूर्वीही दिल्ली कॅपिटल्समध्ये कोरोनाचे प्रकरण

IPL च्या 15 व्या सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेटर पॉझिटिव्ह होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचे दोन परदेशी क्रिकेटर्स टीम सिफर्ट आणि मिचेल मार्श यांच्यासहित चार जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते.

मुख्य कोचचे नीकटवर्तीयही झाले होते संक्रमित

दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य कोच रिकी पाँटिंग यांचे नीकटवर्तीयही कोरोना संक्रमित झाले होते. त्यानंतर पाँटिंग यांना काही दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागले होते. त्यामुळे मॅचेसच्या काळात ते टीमसोबत उपस्थित राहू शकले नाहीत.

दिल्लीची मॅच पुण्यातून मुंबईला केली होती शिफ्ट

दिल्ली कॅपिटल्सचे दोन प्लेअर्स आणि इतर 4 सदस्य कोरोना पॉझटिव्ह झाल्यानंतर दिल्लीची पूर्ण टीम क्वारंटाईन करण्यात आली होती. तसेच पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यासोबत असलेल्या मॅचेस पुण्यातून मुंबईत हलवण्यात आल्या होत्या

गेल्या वेळी आयपीएलचा सीझन करावा लागला होता स्थगित

कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीचा फटका गेल्यावर्षीही आयपीएलला बसला होता. कोरोनाच्या उद्रेकामुळे आयपीएलचा सीझन स्थगित करण्याची वेळ बीसीसीआयवर आली होती. याही वेळी हा प्रकार घडू नये यासाठी पूर्ण उपाययोजना करण्यात आल्या होत्या. आता आयपीएलबाबत पुढे काय होणार, याची उत्सुकता आहे.

देशात गेल्या 24 तासांत 3451 रुग्णांची भर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत 3451 रुग्णांची भर पडली आहे. तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 35 रुग्ण एकट्या केरळ राज्यातील आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांचा एकूण आकडा हा 4,25,57,495 वर पोहचला आहे.

भारतात 47 लाख रुग्ण दगावले– WHO

कोरोना संसर्गामुळे देशात आत्तापर्यंत 5 लाख 24 हजार 64 रुग्ण दगावल्याची आकडेवारी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं भारतात कोरोनामुळे 47 लाख रुग्ण दगावल्याचा आकडा जाहीर केला आहे. या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.