Video : कॅरेबियन लीगमध्ये राडा, तो फक्त शांत बसला अन् थेट RCB खेळाडूला दाखवलं आभाळ, व्हिडीओ व्हायरल
CPL 2024 : कॅरेबियन लीगमध्ये वेस्ट इंडिजच्या दोन खेळाडूंमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळणाऱ्या खेळाडूची दुसऱ्या खेळाडूने गगनचुंबी षटकार मारत जिरवली. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कॅरेबियन लीग 2024 मधील लुसिया किंग्स आणि गयाना ॲमेझॉन वॉरियर्समधील सामन्यातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन कॅरेबियन एकमेकांना भिडलेले पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजचे दोन्ही खेळाडू भिडल्यावर मैदानात त्याचे परिणाम दिसणार यात काही शंक नाही. अल्झारी जोसेफ आणि शिमरॉन हेटमायर यांच्यामध्ये हा शीतयुद्ध झालं. पण शेवटी हेटमायरने त्याची पॉवर हिटिंग करत जोसेफला बॅकफूटला ढकललं.
नेमकं काय घडलं?
कॅरेबियन प्रीमियर लीग मधीस लुसिया किंग्स आणि गयाना ॲमेझॉन वॉरियर्स यांच्यात सामना सुरू होता. गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघ टार्गेटचा पाठलाग करत होता. सामन्यातील 9व्याओव्हरमधील शेवटच्या बॉलवर हा राडा झाला. गयाना ॲमेझॉन वॉरियर्सचा शिमरॉन हेटमायर स्ट्राईकवर होता तर अल्झारी जोसेफ हा गोलंदाजी करत होता. हेटमायरने डिफेंड केलेला बॉल अल्झारीने अडवला आणि हेटमायर उभा असलेल्या स्टम्पच्या दिशने फेकला. इतकंच नाहीतर जोसेफने हेटमायरला खुन्नस दिल्याचं पाहायला मिळालं.
पाहा व्हिडीओ:-
Hetmyer strikes back 🤩🇬🇾 #CPL24 #CricketPlayedLouder #BiggestPartyInSport pic.twitter.com/pGzVBTxCD4
— CPL T20 (@CPL) September 14, 2024
स्ट्राईकवर उभा असलेल्या हेटमायर याने त्यावेळी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र त्यानंतर हेटमायरने मिडविकेटवर एक कडक सिक्सर मारला. या सिक्सरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पाहायला मिळाला आहे. गयानाला विजयासाठी 67 बॉलमध्ये फक्त नऊ धावांची गरज होती. गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघाने हा सीपीएल सामना जिंकला.
हे खूप निराशाजनक आहे. प्रथम फलंदाजी करताना आम्ही चूका केल्या. फक्त परिस्थितीचे आकलन करून योग्य पद्धतीने खेळणे गरजेचे होते. जेव्हा अशा विकेट्स जाता तेव्हा त्यांनी आम्हाला रोखण्यासाठी चांगले प्रयत्न केल्याचं लुसिया किंग्सचा कॅप्टन फाफ डु प्लेसिस म्हणाला.