AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिंकू सिंहवर सर्वात मोठं संकट, मोठ्या आजारामुळे वडील थेट व्हेंटिलेटरवर, टीम इंडियात रिंकू परतणार का?

भारताचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंह याच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यानंतर तो संघाला सोडून दिल्लीला परतला आहे. आता त्याच्या वडिलांना नेमकं काय झालं, याची माहिती समोर आली आहे.

रिंकू सिंहवर सर्वात मोठं संकट, मोठ्या आजारामुळे वडील थेट व्हेंटिलेटरवर, टीम इंडियात रिंकू परतणार का?
rinku singh father khanchandra singhImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 25, 2026 | 3:07 PM
Share

Rinku Singh Father Cancer : टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिंकू सिंह याला आज वेगळ्या ओळखीची गरज नाही. मैदानात पाय ठेवताच त्याचे चाहते त्याचा जयजयकार करतात. फलंदाजी करतानाच त्याचा अंदाज तर अनेकांना भुरळ घालणारा आहे. भारतीय क्रिकेट संघात त्याला फिनिशर म्हणून ओळखले जाते. संघ कितीही संकटात सापडला तरीही तो फलंदाजीच्या जोरावर विजयश्री खेचून आणतो. याच रिंकू सिंहच्या कुटुंबावर मात्र सध्या मोठं संकट आलं आहे. सध्या टी-20 क्रिकेट स्पर्धा चालू असताना या संकटामुळे रिंकू सिंहला ही स्पर्धा सोडून कुटुंबाकडे परतावे लागले आहे.

रिंकूच्या कुटुंबाला नेमकं काय झालंय?

मिळालेल्या माहितीनुसार रिंकू सिंह याचे वडील खानचंद्र सिंह यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. सध्या त्यांना ग्रेटर नोएडा येथे रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. खानचंद्र सिंह यांची प्रकृती नेमकी का बिघडली आहे, हे अद्याप समोर आले नव्हते. आता मात्र त्यांना नेमका कोणता आजार झाला आहे, याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार खानचंद्र सिंह यांना यकृताचा (लिव्हर) कर्करोग झाला आहे. हा कर्करोग चौथ्या पातळीवर असल्याचे म्हटले जात आहे. म्हणूनच त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ही माहिती समजताच रिंकू सिंह 24 फेब्रुवारी रोजी चेन्नईहून दिल्लीला पोहोचले. ते ग्रेटर नोएडा येथे आपल्या वडिलांना भेटायला गेले आहेत.

रिंकू सिंह पुन्हा संघात परतणार का?

वडिलांना कर्करोग झाल्यामुळे आता रिंकू सिंह संघात परतणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार रिंकू सिंह लवकरच पुन्हा एकदा भारतीय संघात परतू शकतो. वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे रिंकू सिंह ट्रेनिंग सेशनमध्ये सहभागी होऊ शकला नाही. त्याला लवकरच वडिलांच्या भेटीला जावे लागले. त्यामुळे तो झिम्बॉम्बेविरोधातील सामन्यात संघाबाहेर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, टी-20 स्पर्धेमध्ये रिंकू सिंह संघाचा भाग असला तरीही त्याला फलंदाजीमध्ये अद्याप लक्षणीय कामगिरी करता आलेली नाही. पाचही सामन्यांत त्याला 15 पेक्षा जास्त धावा करता आलेल्या नाहीत.

Follow Us
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार

विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून खूप त्रास..; CJP आंदोलनावर जॉनी लिव्हर यांनी सोडलं मौन.

विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून खूप त्रास..; CJP आंदोलनावर जॉनी लिव्हर यांनी सोडलं मौन

Priyanka Gandhi : काल मोदींच्या घराबाहेर आंदोलन, आज काय?  काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी  म्हणाल्या की...

Priyanka Gandhi : काल मोदींच्या घराबाहेर आंदोलन, आज काय? काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी म्हणाल्या की..

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन.

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन