सायलीला ‘परफेक्ट पती’ सापडल्याच्या चर्चा, ऋतुराज म्हणतो “क्लीन बोल्ड होईन तर…”

सायलीने ऋतुराजला क्लिन बोल्ड केलं, इथपर्यंत चर्चा येऊन ठेपली. पण काहीच दिवसांत ऋतुराजने या चर्चेमधील हवा काढून घेतली आहे. (CSK Cricketer Ruturaj Gaikwad Insta Story On Affairs With Actress Sayali Sanjiv)

सायलीला 'परफेक्ट पती' सापडल्याच्या चर्चा, ऋतुराज म्हणतो "क्लीन बोल्ड होईन तर..."
माझी विकेट फक्त बोलर्सच घेऊ शकतात आणि क्लिन बोल्डही... असं म्हणत ऋतुराजने सायलीबरोबरच्या अफेअर्सच्या शक्यता फेटाळून लावल्या.

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातील मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) आयपीएलच्या 14 व्या पर्वात (IPL 2021) आपल्या बॅटिंगने अनेकांची मनं जिंकली. अनेकांची मनं जिंकता जिंकता एका खास व्यक्तीचंही त्याने मन जिंकलं. मग सुरु झाला ‘कुछ तुम बोलो कुछ हम बोले’चा प्रवास… मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjiv) आणि ऋतुराज गायकवाडच्या एकमेकांच्या फोटोंवरील कमेंटने दोघांच्यात खास नातं असल्याची चर्चा सुरु झाली. सायलीने ऋतुराजला क्लिन बोल्ड केलं, इथपर्यंत चर्चा येऊन ठेपली. पण काहीच दिवसांत ऋतुराजने या चर्चेमधील हवा काढून घेतली आहे. माझी विकेट फक्त बोलर्सच घेऊ शकतात आणि क्लिन बोल्डही… असं म्हणत त्याने सायलीबरोबरच्या अफेअर्सच्या शक्यता फेटाळून लावल्या. (CSK Cricketer Ruturaj Gaikwad Insta Story On Affairs With Actress Sayali Sanjiv)

ऋतुराजने पोस्टमध्ये काय म्हटलंय…?

गेली महिनाभर ऋतुराज आणि सायलीमध्ये ‘प्यार का बंधन’ असल्याची चर्चा सुरु होती. पण जशी आयपीएल स्पर्धा स्थगित झाली आणि ऋतुराजला वेळ मिळाला, त्याने तातडीने एक इन्टास्टोरी पोस्ट केली. त्यामध्ये तो म्हणतो, “माझी विकेट फक्त बोलर्सच घेऊ शकतो आणि हो क्लिन बोल्डसुद्धा… कुणाचं काय तर कुणाचं काय”, असं कॅप्शन लिहिलेला एक फोटो ऋतुराजने शेअर केला. फोटोमध्ये ऋतुराजचा क्लिन बोल्ड उडाल्याचं पाहायला मिळतंय. तर हा फोटो ऋतुराजने मुद्दामहून शेअर केलाय.

फोटोखाली आणखी एक कॅप्शन लिहित ऋतुराज म्हणतो, “ज्यांना समजायचं त्यांना समजलं… कुणीतरी खरंच म्हटलंय…. मीठ, मसाला आणि मिर्ची टाकली की बरोबर चव येते”. ऋतुराजच्या या कॅप्शननेही चाहत्यांच्या मनात संभ्रम आहे. ऋतुराजला नेमकं कुणाला समजवायचंय? असा प्रश्न फॅन्सना पडलाय.

Ruturaj Gaikwad Insta Story On Affairs With Actress Sayali Sanjiv

ली महिनाभर ऋतुराज आणि सायलीमध्ये ‘प्यार का बंधन’ असल्याची चर्चा सुरु होती.

सायली ऋतुराजच्या अफेयर्सची चर्चा सुरु कशी झाली?

मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव हिच्या फोटोव ऋतुराजने कमेंट केली. त्याने कमेंट केलेला फोटोही तसा खासच होता म्हणे. सायलीने या फोटोत वन पिस ड्रेस घातला होता. त्याच फोटोवर ऋतुराजने कमेंट केली.  या फोटोवर ऋतुराजने ‘Woahh😍♥️’ (वोआह) अशी कमेंट केली. या कमेंटला प्रतिसाद देत सायलीने हार्टचा ईमोजी शेअर केला होता. एकमेकांच्या कमेंट चर्चेच्या विषय ठरल्या.

या कमेंट वाचून दोघांच्या चाहत्यांनी प्रतिक्रियांच्या पाऊस पाडला. कोणी म्हणालं, यांचं जमतंय बहुतेक, तर कोणी सायली रिलेशनशीपमध्ये आहे भाऊ, असं म्हणत ऋतुराजची विकेट घेण्याचा प्रयत्न केला.

कोण आहे सायली संजीव

सायलीने झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. सध्या सायली कलर्स मराठीवर ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत काम करत आहे. परफेक्ट पती या मालिकेतही तिने काम केलंय. आटपाडी नाईट्स या मराठी सिनेमातील तिची भूमिकाही विशेष गाजली होती.

(CSK Cricketer Ruturaj Gaikwad Insta Story On Affairs With Actress Sayali Sanjiv)

हे ही वाचा :

सायली संजीवच्या फोटोवर ऋतुराज गायकवाड फिदा, सायलीनेही लाजत ‘दिल’ दिया