सायली संजीवच्या फोटोवर ऋतुराज गायकवाड फिदा, सायलीनेही लाजत ‘दिल’ दिया

अभिनेत्री सायली संजीवने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर ऋतुराजने 'Woahh😍♥️' (वोआह) अशी कमेंट केली.

1/8
'चेन्नई सुपरकिंग्ज'चा (Chennai Superkings - CSK) युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये चांगलाच फॉर्ममध्ये होता. आयपीएलला स्थगिती मिळाली, तसा ऋतुराजलाही इन्स्टाग्राम अकाऊण्टवर अॅक्टिव्ह होण्यास वेळ मिळाला.
2/8
ऑन फील्ड भल्याभल्यांची विकेट घेणाऱ्या ऋतुराजची ऑफ फील्ड विकेट गेल्याचं दिसतंय. मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) हिच्या फोटोवरील ऋतुराजची कमेंट चर्चेचा विषय ठरली आहे.
3/8
अभिनेत्री सायली संजीवने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर ऋतुराजने 'Woahh😍♥️' (वोआह) अशी कमेंट केली. या कमेंटला प्रतिसाद देत सायलीने हार्टचा ईमोजी शेअर केला होता.
4/8
ही कमेंट वाचून दोघांच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला. कोणी म्हणालं, यांचं जमतंय बहुतेक, तर कोणी सायली रिलेशनशीपमध्ये आहे भाऊ, असं म्हणत ऋतुराजची विकेट घेण्याचा प्रयत्न केला.
5/8
सायलीने झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
6/8
सध्या सायली कलर्स मराठीवर 'शुभमंगल ऑनलाईन' या मालिकेत काम करत आहे. आटपाडी नाईट्स सिनेमातील तिची भूमिकाही गाजली होती
7/8
ऋतुराज जितका मैदानावरील कामगिरीसाठी गाजतो, तितकाच तो आपल्या स्टाईल आणि लूक्ससाठीही प्रसिद्ध आहे.
8/8
याआधी ऋतुराजच्या फोटोवरही सायलीने कमेंट केली होती. त्यामुळे दोघांमध्ये आंखो ही आंखोमें बरंच काही होताना दिसतंय