AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs DC IPL 2023 Highlight : चेन्नईनं दिल्लीला 27 धावांनी नमवलं, प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल टाकलं

| Updated on: May 10, 2023 | 11:18 PM
Share

CSK vs DC IPL 2023 Highlight : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर होत आहे. दिल्लीसाठी हा सामना करो या मरोची लढाई आहे.

CSK vs DC IPL 2023 Highlight : चेन्नईनं दिल्लीला 27 धावांनी नमवलं, प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल टाकलं
CSK vs DC IPL 2023 Live Update : दिल्ली विरुद्ध चेन्नई सामना, प्लेऑफचं गणित आणखी स्पष्ट होणार

मुंबई : चेन्नई सुपर किंग्सने दिलेलं 168 धावांचं आव्हान दिल्लीला पेललं नाही. दिल्लीला 140 धावांवर रोखत 27 धावांनी विजय मिळवला सुरुवातीपासून चेन्नईचे गोलंदाज दिल्लीच्या फलंदाजांवर हावी झाले. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरच डेविड वॉर्नर बाद झाला. त्यानंतर फलंदाजांना कमबॅक करण्यास गोलंदाजांनी संधीच दिली नाही. एखाद दोन षटकार मारले पण निर्धाव चेंडूमुळे विजयी धावांचं अंतर वाढतच गेलं. यामुळे दिल्लीला पुन्हा एकदा पराभवाचं तोंड पाहावं लागलं. चेन्नईने या विजयासह प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. 15 गुणांसह गुणतालिकेत दुसरं स्थान कायम ठेवलं आहे. त्यामुळे आता उर्वरित दोन सामन्यापैकी एका सामन्यात विजय मिळवून थेट प्लेऑफमध्ये स्थान मिळणार आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 10 May 2023 11:17 PM (IST)

    CSK vs DC IPL 2023 Live Update Score : दिल्लीचा डाव

    चेन्नई सुपर किंग्सने विजयासाठी दिलेलं 168 धावांचं आव्हान गाठताना खराब सुरुवात झाली. दीपक चाहरच्या दुसऱ्याच चेंडूवर डेविड वॉर्नर बाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर फिल सॉल्ट 17 धावांवर बाद झाला. त्यामुळे संघावर दबाव वाढला. मिशेल मार्श धावचीत झाला आणि धावांचं अंतर वाढतच गेलं. मनिष पांडे आणि रिली रोसोनं अर्धशतकी भागीदारी केली. पण इतक्या धीम्या गतीने केली त्याला काहीच अर्थ उरला नाही. मनिष पांडे 29 चेंडूत 27 धावा करून बाद झाला. त्यानंतर रिली रोस्सोही 35 धावा करून तंबूत परतला.

    अक्षर पटेलने फटकेबाजी करत धावांचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. 21 धावा करून बाद झाला. रिपल पटेलही धावचीत होत तंबूत परतला, तिथपर्यंत संपूर्ण सामन्यावर चेन्नईची पकड निर्माण झाली होती. अखेर हा सामना चेन्नईने 27 धावांनी जिंकला.

  • 10 May 2023 11:02 PM (IST)

    CSK vs DC IPL 2023 Live Update Score : दिल्लीला सहावा धक्का

  • 10 May 2023 10:44 PM (IST)

    CSK vs DC IPL 2023 Live Update Score : दिल्लीचा पाचवा गडी बाद

  • 10 May 2023 10:36 PM (IST)

    CSK vs DC IPL 2023 Live Update Score : दिल्लीचा चौथा गडी बाद

  • 10 May 2023 09:57 PM (IST)

    CSK vs DC IPL 2023 Live Update Score : दिल्लीचा तिसरा गडी बाद

  • 10 May 2023 09:53 PM (IST)

    CSK vs DC IPL 2023 Live Update Score : दिल्लीला फिल सॉल्टच्या रुपाने दुसरा धक्का

  • 10 May 2023 09:37 PM (IST)

    CSK vs DC IPL 2023 Live Update Score : दिल्लीला पहिला धक्का

  • 10 May 2023 09:28 PM (IST)

    CSK vs DC IPL 2023 Live Update Score : चेन्नईचा डाव

    चेन्नई सुपर किंग्सने दिल्लीसमोर विजयासाठी 168 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चेन्नईची पॉवर प्लेमध्ये धीमी सुरुवात झाली. पाचव्या षटकात संघाच्या 42 धावा असताना डेवॉन कॉनव्हे बाद झाला. त्यानंतर ऋतुराज गायकवाड 24 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर आलेला मोईन अली काही खास करू शकला नाही. अवघ्या 7 धावा करत तंबूत परतला. शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणेनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अजिंक्य रहाणेला 21 धावांवर ललित यादवने तंबूचा रस्ता दाखवला.

    शिवम दुबेने काही मोठे फटके मारत संघाच्या धावांमध्ये भर घालण्याचा प्रयत्न केला. पण मिशेल मार्शने त्याला तंबूत पाठवलं. अंबाती रायडू (23, रवींद्र जडेजा (21, महेंद्रसिंह धोनी (20 धावा करून तंबूत परतले.

    दिल्लीकडून मिशेल मार्शने 3, अक्षर पटेलने 2, कुलदीप यादवने 1, खलील अहमदने 1 आणि ललित यादवने एक गडी बाद केला.

  • 10 May 2023 09:19 PM (IST)

    CSK vs DC IPL 2023 Live Update Score : महेंद्रसिंह धोनी 20 धावा करून बाद

  • 10 May 2023 09:16 PM (IST)

    CSK vs DC IPL 2023 Live Update Score : रवींद्र जडेजा बाद

  • 10 May 2023 08:59 PM (IST)

    CSK vs DC IPL 2023 Live Update Score : चेन्नई सुपर किंग्सला सहावा धक्का

  • 10 May 2023 08:44 PM (IST)

    CSK vs DC IPL 2023 Live Update Score : चेन्नईला पाचवा धक्का, शिवम दुबे बाद

  • 10 May 2023 08:28 PM (IST)

    CSK vs DC IPL 2023 Live Update Score : चेन्नईला चौथा धक्का, रहाणे बाद

    ललित यादवने त्याच्यात गोलंदाजीवर अजिंक्य रहाणेचा झेल घेतला. अजिंक्य रहाणे 20 चेंडूत 21 धावा करून तंबूत परतला आहे.

  • 10 May 2023 08:20 PM (IST)

    CSK vs DC IPL 2023 Live Update Score : कुलदीप यादवने मोईन अलीला पाठवलं तंबूत

    मोईन अली 7 धावा करून तंबूत परतला आहे. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मिशेल मार्शने त्याचा झेल घेतला.

  • 10 May 2023 08:10 PM (IST)

    CSK vs DC IPL 2023 Live Update Score : चेन्नईला दुसरा धक्का, ऋतुराज गायकवाड बाद

  • 10 May 2023 07:58 PM (IST)

    CSK vs DC IPL 2023 Live Update Score : डेवॉन कॉनव्हेच्या रुपाने चेन्नईला पहिला झटका

    डेवॉन कॉनव्हे 10 धावा करून बाद झाला. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर पायचीत होत तंबूत परतला.

  • 10 May 2023 07:07 PM (IST)

    CSK vs DC IPL 2023 Live Update Score : दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

    चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार / विकेटकीपर), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना

    दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रोसो, अक्षर पटेल, अमन हकीम खान, ललित यादव, कुलदीप यादव, मुकेश कुमार, खलील अहमद, इशांत शर्मा

  • 10 May 2023 07:01 PM (IST)

    CSK vs DC IPL 2023 Live Update Score : नाणेफेकीचा कौल चेन्नईच्या बाजूने प्रथम फलंदाजी

    नाणेफेकीचा कौल जिंकत चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी निवडली आहे. संघात एक बदल केला असल्याचं महेंद्र सिंह धोनीने सांगितलं.  “आम्ही प्रथम फलंदाजी करू. या विकेटवर आम्ही काही खेळ खेळले आहेत. ही विकेट मंद होण्याची शक्यता आहे.”, असं धोनीने सांगितलं.

  • 10 May 2023 05:33 PM (IST)

    CSK vs DC IPL 2023 Live Update Score : चेन्नई आणि दिल्ली संभाव्य प्लेइंग 11

    चेन्नई सुपर किंग्स : डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोइन अली, रवींद्र जडेजा, एम एस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), शिवम दुबे, तुषार देशपांडे, दीपक चाहर, महेश तीक्षणा, मथीशा पथिराना, अजिंक्य रहाणे

    दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनिष पांडे, रिले रोस्सो, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, कुलदीप यादव, मिशेल मार्श, ईशांत शर्मा, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), अमन हाकिम खान

  • 10 May 2023 05:30 PM (IST)

    CSK vs DC IPL 2023 Live Update Score : दिल्लीचा संपूर्ण संघ

    दिल्लीचा पूर्ण स्क्वॉड : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विक्की ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रूसो.

  • 10 May 2023 05:30 PM (IST)

    CSK vs DC IPL 2023 Live Update Score : चेन्नईचा संपूर्ण संघ

    चेन्नईचा पूर्ण स्कॉड : एमएस धोनी, डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापति, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोइन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीश पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधु आणि अजय मंडल.

Published On - May 10,2023 5:29 PM

Follow us
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.