AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल मेगा ऑक्शआधी RCB चा मोठा ‘डाव’, मुंबईला चॅम्पियन करणाऱ्या दिग्गजाचा टीममध्ये समावेश

IPL 2025 RCB : आरसीबीने आयपीएलच्या 18 व्या मोसमाआधी मोठा डाव खेळला आहे. मुंबईला चॅम्पियन करणाऱ्या दिग्गजाची आरसीबीने आपल्या गोटात एन्ट्री करुन घेतली आहे.

आयपीएल मेगा ऑक्शआधी RCB चा मोठा 'डाव', मुंबईला चॅम्पियन करणाऱ्या दिग्गजाचा टीममध्ये समावेश
rohit sharma and virat kohli ipl
| Updated on: Nov 18, 2024 | 7:55 PM
Share

आयपीएल 18 व्या मोसमाआधी मेगा ऑक्शनकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. त्याआधी आयपीएलच्या गेल्या 17 मोसमात एकदाही ट्रॉफी न जिंकू शकणाऱ्या आरसीबीने मोठा डाव खेळला आहे. आरसीबीने मुंबईला चॅम्पियन करणाऱ्या दिग्गजाचा टीममध्ये समावेश केला आहे. ओमकार साळवी यांची आरसीबी गोलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आरसीबीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. ओमकार साळवी यांनी त्यांच्या मार्गदर्शनात मुंबईला रणजी ट्रॉफी आणि इराण कप जिंकून देण्यात निर्णायक योगदान दिलं होतं.

ओमकार साळवी कोच असतानाच मुंबई टीमने रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. इतकंच नाही, तर मुंबईने इराणी कप सलग 2 वेळा उंचावला. ओमकार साळवी यांनी त्यांच्या मार्गदर्शनात मुंबईला गतवैभव मिळवून देण्याचा मोलाचा वाटा उचलला. ओमकार साळवी यांनी याआधी कोलकाता नाईट रायडर्समध्ये सहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओमकार साळवी देशांतर्गत क्रिकेट हंगाम संपल्यानंतर मार्च 2025 मध्ये आरसीबीसह जोडले जाणार आहेत. ओमकार साळवी यांचा एमसीएसोबतचा करार हा मार्चमधील पहिल्या आठवड्यात संपणार आहे.

ओमकार साळवी यांच्यासमोर मोठं आव्हान

बॉलिंग ही आरसीबीची उणीवेची बाजू आहे. अशात ओमकार साळवी यांच्यासमोर आरसीबीच्या गोलंदाजीला धार मिळवून देण्याचं आव्हान असणार आहे, साळवी मुंबईसह 2023-2024 या हंगामासाठी हेड कोच म्हणून जोडले गेले. त्यांच्या मार्गदर्शनात मुंबईने 42 व्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली. त्यामुळे साळवी यांना रिटेन करण्यात आलं.

ओमकार साळवी आरसीबीचे बॉलिंग कोच

आरसीबीची 17 वर्षांची प्रतिक्षा संपणार?

दरम्यान आरसीबीला आयपीएलच्या इतिहासात गेल्या 17 वर्षांमध्ये एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात यश आलेलं नाही. आरसीबी 2016 साली अंतिम फेरीत पोहचली होती. मात्र तेव्हा हैदराबादने पराभूत केल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. तर 17 व्या मोसमात आरसीबीचा एलिमिनेटर सामन्यात पराभव झाला होता.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.