WPL 2026 : लिलावात सर्वात कमी वयाच्या खेळाडूवर लागली बोली, असा आहे रेकॉर्ड
WPL 2026 Auction: वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेसाठी सर्वात कमी वयाच्या खेळाडूवर बोली लागली. त्यामुळे आता तिच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. बोली लागली म्हणजे चांगली खेळाडू असणार यात काही शंका नाही. त्यामुळे तिच्याबाबत सविस्तर काय ते जाणून घेऊयात..

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत खेळाडूंवर बोली लागली आणि एका दिवसात लिलाव संपला. त्यामुळे प्रत्येक संघात किती प्लेयर्स आणि किती खर्च झाले याचा हिशेब लागला आहे. असं असताना या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने 16 वर्षीय खेळाडूवर बोली लावली आणि संघात घेतलं. त्यामुळे या खेळाडूची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. 16 वर्षीय दिया यादवला पहिल्यांदा वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे तिच्यासाठी लिलावात बोली लागताच सर्वात कमी वयाची खेळाडू म्हणून इतिहास रचला गेला आहे. कारण या लीग स्पर्धेतील ती सर्वात कमी वयाची खेळाडू ठरली आहे. दियाचं वय फक्त 16 वर्षे असून ती हरियाणा संघाची ओपनर फलंदाज आहे. आता ओपनिंग करते आणि आक्रमक खेळत नाही असं होऊच शकत नाही. नाही तर दिल्लीने तिच्यासाठी फासे का टाकले असते? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.
दिया यादवने हरियाणासाठी कमी वयातच ओपनिंग केली. अवघ्या 14व्या वर्षी शतकी खेळी करून चर्चेत आली होती. इतकंच काय तर वुमन्स अंडर 15 वनडे कप स्पर्धेत दिल्लीविरुद्ध नाबाद 124 धावा केल्या. तिच्या आक्रमक फलंदाजीमुळे गोलंदाजांची दाणादाण उडते. इतकंच काय तर पॉवर प्लेमध्ये सामना फिरवण्याची ताकद 16 वर्षीय खेळाडूत आहे. सध्या दिया शर्मा वरिष्ठ वुमन्स इंटर झोनल टी20 ट्रॉफीत नॉर्थ झोनसाठी खेळत आहे. या स्पर्धेत दियाची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. 5 डावात दियाने 30.20 च्या सरासरीने 151 धावा केल्या आहे. तिचा स्ट्राईक रेट 150 च्या जवळपास आहे. दिल्ली कॅपिटल्सने तिला 10 लाखांच्या बेस प्राईससह संघात सहभागी करून घेतलं आहे.
Deeya Yadav is SOLD to @DelhiCapitals for her base price of INR 10 Lakh!#TATAWPL | #TATAWPLAuction
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) November 27, 2025
दिल्ली कॅपिटल्स संघात तगडी स्टारकास्ट असल्याने दिया यादवला ओपनिंग उतरण्याची संधी मिळेल की नाही याबाबत शंका आहे. कारम संघात लॉरा वॉल्वार्ड आणि शफाली वर्मा असताना ओपनिंगला संधी मिळणं खूपच कठीण आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ : दिया यादव, जेमिमा रॉड्रिग्स, लॉरा वॉल्वॉर्ड, शफाली वर्मा, एनाबेल सुदरलँड, चिनले हेन्री, मेरिझेन कॅप, मिन्नू मणी, निकी प्रसाद, स्नेह राणा, लिझेल ली, ममता मडिवाल, तानिया भाटीया, लुसी हामिल्टन, नंदिनी शर्मा
