WPL 2026 : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत अनुष्का शर्मा गुजरात जायंट्सकडून खेळणार, आरसीबीच्या प्रयत्नांना अपयश
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या पर्वापूर्वी खेळाडूंवर बोली लागली. काही खेळाडू भाव खाऊन गेले तर काही खेळाडूंसाठी बोली लागलीच नाही. असं असताना एक नाव चर्चेत राहिलं ते म्हणजे अनुष्का शर्मा...

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेला 9 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना 5 फेब्रुवारीला होणार आहे. ही स्पर्धा नवी मुंबई आणि वडोदरा येथे खेळली जाणार आहे. या स्पर्धेसाठी फ्रेंचायझी मेगा लिलावात बोली लावून संघाची बांधणी करत आहे. लिलावाला सुरुवात झाली आणि ऑस्ट्रेलिया एलिसा हिलीचं पहिलं नाव घेतलं गेलं. मात्र तिच्यासाठी कोणीच बोली लावली नाही. त्यामुळे एलिसा हिली अनसोल्ड राहिली. त्यानंतर दीप्ती शर्माचं नाव आलं. 50 लाखांच्या बेस प्राईसवर तिच्यासाठी बोली लावण्यासाठी कोणी उत्सुक दिसलं नाही. पण दिल्ली कॅपिटल्सने बेस प्राईसवर विकत घेण्याची तयारी दर्शवली. पण युपी वॉरियर्सने आरटीएम कार्ड खेळलं आणि 2.60 कोटींना आपल्या संघात पुन्हा सहभागी करून घेतलं. असं सर्व होत असताना एक नाव समोर आलं आणि क्रीडाप्रेमींना धक्का बसला. कारण हे नाव होतं अनुष्का शर्माचं… अनेकांना विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तर नाही ना असा प्रश्नही प्रश्नही पडला. पण ही अनुष्का शर्मा वेगळी आहे. केवळ नामसाध्यर्म असल्याने अनेकांचा गोंधळ झाला.
विशेष म्हणजे अनुष्का शर्माला संघात घेण्यासाठी आरसीबीने बोली लावली होती. पण गुजरात जायंट्स बोली लावण्यात वरचढ ठरला. भारतीय क्रिकेटपटू अनुष्का शर्माला गुजरात संघाने 45 लाख रुपयांना खरेदी केले. अनुष्का शर्मा 10 लाखांच्या बेस प्राईस लिलावात उतरली होती. त्यानंतर आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात तिच्यासाठी चढाओढ झाली. अखेर तिच्यासाठी गुजरात टायटन्सने सर्वाधिक 45 लाखांची बोली लावली आणि तिला संघात घेतला.
Anushka Sharma next with a base price of INR 10 Lakh.
She will feature in @Giant_Cricket 🧡 colours for INR 45 Lakh!#TATAWPL | #TATAWPLAuction
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) November 27, 2025
गुजरात जायंट्सने विदेशी स्टार खेळाडू एशले गार्डनर आणि बेथ मूनी यांना कायम ठेवले आहे. गार्डनर यांना 3.5 कोटी आणि बेथ मूनीला 2.5 कोटी देऊन रिटेन केले होते. एशले गार्डनर, बेथ मूनी, रेणुका सिंह ठाकुर, अनुष्का शर्मा, भारती फुलमाली, सोफी डिवाइन, केशव गौतम, रेणुका सिंह, तिलास साधु आणि अनुष्का शर्मा आतापर्यंत संघात सहभागी झाले आहे. अजूनही काही खेळाडूंची यात भर पडेल.
