IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्स स्पर्धेतून आऊट झाल्यानंतर संघ मालकाने सरळ सांगितलं की…
आयपीएल 2025 स्पर्धेतील 63व्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभव झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा प्लेऑफच्या शर्यतीतून पत्ता कट झाला आहे. सुरुवात चांगली झाली होती पण नंतर सर्व काही बिघडलं. यानंतर दिल्ली कॅपिट्ल्सचे मालक पार्थ जिंदाल यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेतून दिल्ली कॅपिटल्सचा प्लेऑफचा प्रवास संपला आहे. या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात सर्वात टॉप असलेल्या संघाची असा शेवट झाला. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात प्लेऑफच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या. सुरुवात चांगली करूनही अशा पद्धतीने बाद झाल्याने दिल्ली कॅपिटल्सचे चाहते निराश आहेत. असं अचानक काय झालं की संघाची वाताहत झाली. हे गणित काही कोणाला कळालं नाही. पण स्पर्धेतील शेवट वाईट झाला असं म्हणावं लागेल. पहिल्या आठपैकी सहा सामन्यात विजय मिळवूनही प्लेऑफचा प्रवास संपुष्टात आला. शेवटच्या पाच पूर्ण झालेल्या सामन्यापैकू चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात 59 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक पार्थ जिंदाल यांनी चाहत्यांची मनापासून माफी मागितली. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पार्थ जिंदाल यांनी या पर्वाबाबत निराशा व्यक्ती केली.
‘सर्व दिल्ली कॅपिटल्स चाहत्यांसाठी माफ करा – तुमच्याप्रमाणेच, मीही हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यामुळे अस्वस्थ आहे. ज्याची सुरुवात इतकी चांगली झाली ती अत्यंत वाईट रीतीने संपली,” असे त्यांनी लिहिले. “या मोहिमेतून काही सकारात्मक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत पण सध्या सर्वांचे लक्ष पुढील सामन्यावर आहे जो आपल्याला जिंकायचा आहे. हंगामानंतर अनेक पैलूंवर खूप आत्मपरीक्षण करावे लागेल.’ आयपीएलच्या इतिहासात पहिले चार सामने जिंकल्यानंतरही प्लेऑफमध्ये पोहोचू न शकणारा दिल्ली कॅपिटल्स हा पहिला संघ ठरला आहे.
Sorry to all @DelhiCapitals fans – like you i too am reeling from the second half of the season. What started so well ended extremely poorly. There are positives to take from this campaign but for now all focus on the next game which we need to win. Post the season there will…
— Parth Jindal (@ParthJindal11) May 21, 2025
दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने सांगितलं की, ‘आमच्या हंगामाचा सारांश असा आहे की, गेल्या 6-7 सामन्यांमध्ये आम्ही फलंदाजी किंवा गोलंदाजीत थंड होतो. आयपीएलमध्ये टॉप फोरमध्ये राहण्यासाठी, तुम्ही ते करू शकत नाही. त्यामुळे टॉप फोरमध्ये न जाणे हे कदाचित योग्य प्रतिबिंब असेल. जर तुम्ही मिच सँटनरने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ते पाहिले तर ते खूप समान गोलंदाज आहेत. अक्षर हा अशा प्रकारचा दर्जेदार गोलंदाज आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध झालेला डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. अशा विकेटवर, त्याला गोलंदाजी करायला आवडले असते. दुर्दैवाने, गेल्या दोन दिवसांपासून तो खूप आजारी होता.’
