आयपीएलमध्ये एकाच संघात असूनही सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यात जुंपली! काय झालं वाचा

आयपीएलचं 17वं पर्व सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंची जोरदार तयारी सुरु आहे. असताना मुंबई इंडियन्स संघात बरीच उलथापालथ दिसत आहे. हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद गेल्यानंतर बराच वादंग झाला आहे. आता एकाच संघात खेळणारे सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा आमनेसामने आले आहेत.

आयपीएलमध्ये एकाच संघात असूनही सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यात जुंपली!  काय झालं वाचा
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 6:32 PM

मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरु होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक पाहता पहिल्या टप्प्यातील सामने जाहीर केले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत क्रिकेटचे सामने पाहता येणार आहेत. यासाठी आयपीएलमधील 10 संघ सज्ज असून जोरदार तयारी सुरु आहे. तसेच यंदाचं जेतेपद कोणाला मिळणार याची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. असं असताना मुंबई इंडियन्स संघात बरीच उलथापालथ झाली आहे. काही खेळाडू नाराज असल्याची चर्चाही रंगली आहे. रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून ते हार्दिक पांड्याकडे सोपवलं गेलं आहे. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराहच्या क्रिप्टिक पोस्ट चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर मार्क बाउचरच्या मुलाखतीवर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे संशयाला वाव मिळण्यासारखं बरंच काही घडलं आहे. असं असताना सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा एकाच संघात असून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. इंस्टाग्रामवर एकमेकांचे पाय खेचण्याची एकही संधी सोडत नाहीत.

तिलक वर्माने त्याच्या इंस्टाग्रामवर हँडलवर कॅप्शनसह वर्कआऊटचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर सूर्यकुमार यादवने आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे. तसेच त्याला गंमतीने टोमणा मारला आहे. त्याला तितक्याच खेळीमेळीने तिलक वर्माने उत्तर दिलं आहे. या दोघांचं उत्तर प्रत्युत्तर पाहून क्रीडारसिकांचं चांगलंच मनोरंजन झालं आहे. मी माझ्या मर्यादा वाढवत आहे असं सांगत तिलक वर्माने वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर सूर्यकुमारने उत्तर देत सांगितलं की, ते पाहू शकत नाही. लगेचच तिलक वर्माने उत्तर देत सांगितलं की, तुला ते लवकरच दिसेल.

View this post on Instagram

A post shared by Tilak Varma (@tilakvarma9)

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेत तिलक वर्मा शेवटचा दिसला होता. मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळला होता आणि तिसऱ्या क्रमांकावर येत 22 चेंडूत 26 धावा केल्या होत्या. विराट कोहली संघात आल्याने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. तर सूर्यकुमार यादव दक्षिण अफ्रिकेत झालेल्या दुखापतीनंतर मैदानापासून दूर आहे. त्यात गेल्या महिन्यात त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली.

मुंबई इंडियन्स पहिल्या चार सामन्यांचं वेळापत्रक

  • 24 मार्च : गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • 27 मार्च : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • 1 एप्रिल : राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • 7 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...