पाचव्या कसोटी सामन्यातून रजत पाटिदारचा पत्ता कट! बीसीसीआयने आखली अशी रणनिती

भारत इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका भारताने 3-1 ने जिंकली आहे. त्यामुळे पाचवा सामना औपचारिक असला तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. एकंदरीत असं चित्र पाहता पाचव्या कसोटी फॉर्म गमावलेल्या रजत पाटिदारचा पत्ता कट होऊ शकतो.

पाचव्या कसोटी सामन्यातून रजत पाटिदारचा पत्ता कट! बीसीसीआयने आखली अशी रणनिती
सुमार कामगिरीचा रजत पाटिदारला बसला फटका! आता चूक सुधारण्यासाठी उचललं असं पाऊल
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 5:18 PM

मुंबई : भारत इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामना 7 मार्च रोजी धर्मशाळा येथे आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ शेवट गोड करण्याचा प्रयत्नात आहे. पाचवा सामना जिंकला तर गुणतालिकेत अव्वल स्थान गाठणं सोपं होणार आहे. त्यामुळे मालिका जिंकली तरी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड संघात काही महत्त्वाचे बदल करण्याची शक्यता आहे. निवडकर्ते 2 मार्चपर्यंत प्लेइंग इलेव्हनबाबत अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. केएल राहुल संघात परतणार की, रजत पाटिदारला संघात स्थान मिळणार यावर खलबतं सुरु झाली आहेत. तीन कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर करताना स्पष्ट केलं होतं की, “केएल राहुल फिट होईपर्यंत रजत पाटिदारला संघात स्थान दिले.” पण सध्या रजत पाटिदारला सूर गवसताना दिसत नाही. दुसरीकडे, केएल राहुल फिट की अनफिट यावरही प्रश्नचिन्ह आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुलला उजव्या क्वाड्रिसेप्समध्ये सतत दुखापत जाणवत असल्याने तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी लंडनला गेला आहे. दुखापतीमुळे तो इंग्लंडविरुद्धच्या मागच्या तीन कसोटी सामन्यांपासून दूर राहिला होता. टाईम्स इंडियाच्या वृत्तानुसार, निवडकर्त्यांना पाटिदारला संघातून वगळायचं आहे. जेणेकरून तो रणजी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मध्य प्रदेशकडून मैदानात उतरेल. हा सामना 2 मार्चला होणार आहे. त्यामुळे केएल राहुल फीट झाला तर रजत पाटिदारला डच्चू मिळेल.

दुसरीकडे, रजत पाटिदारच्या जागी देवदत्त पडिक्कल यालाही संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण रजने मागच्या सहा डावात हवी तशी कामगिरी केलेली नाही. मागच्या सहा डावात रजत पाटिदाराची 32 ही सर्वोत्तम खेळी आहे. पाटिदार दोन वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्यामुळे पाचव्या कसोटीत त्याला या ना त्या कारणाने वगळण्याची शक्यता आहे. शेवटचा कसोटी सामना झाला की आयपीएलची रणधुमाळी असेल. त्यानंतर लगेचच टी20 वर्ल्डकप असणार आहे. त्यामुळे कसोटीसाठी ऑगस्ट सप्टेंबर महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.

Non Stop LIVE Update
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार.
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न.
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?.
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक.
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले...
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले....
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर.
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'.
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'.
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास..
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास...
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका.