AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

12 चौकार आणि 2 षटकार…! ध्रुव जुरेलने कसोटीत ऋषभ पंतची जागा भरली, वडिलांसाठी खास आर्मी सेलिब्रेशन

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. भारताने पहिल्या डावात 200 हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे. तर केएल राहुलनंतर ध्रुव जुरेलने शतकी खेळी करत टीम इंडियाच्या धावसंख्येत भर घातली.

12 चौकार आणि 2 षटकार...! ध्रुव जुरेलने कसोटीत ऋषभ पंतची जागा भरली, वडिलांसाठी खास आर्मी सेलिब्रेशन
12 चौकार आणि 2 षटकार...! ध्रुव जुरेलने कसोटीत ऋषभ पंतची जागा भरली, वडिलांसाठी खास आर्मी सेलिब्रेशनImage Credit source: PTI
| Updated on: Oct 03, 2025 | 4:33 PM
Share

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थिती आहे. वेस्ट इंडिजला 162 धावांवर रोखल्यानतंर टीम इंडियाने ही धावसंख्या पार करत मोठी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांचा झंझावात पाहायला मिळाला. केएल राहुलच्या शतकी खेळीनंतर आणखी एक शतक भारतीय क्रीडाप्रेमींना पाहायला मिळालं. यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने 190 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकार मारत 54.21 च्या स्ट्राईक रेटने शतक ठोकलं. ध्रुव जुरेलने अत्यंत संयमी खेळी करत शतक साजरं केलं. ध्रुव जुरेल हा कसोटीत शतक ठोकणआरा 12 विकेटकीपर आहे. विजय मांजरेकर, सय्यद किरमाणी, अजय रात्रा, दीप दासगुप्ता, एमएस धोनी, नयन मोंगिया, वृद्धिमान साहा आणि ऋषभ पंत यांनी शतक ठोकलं आहे. त्यापैकी पाच जणांनी वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांचं पहिलं शतक झळकावलं आहे. विजय मांजरेकर, फारुख इंजिनियर, अजय रात्रा, वृद्धिमान साहा आणि आता ध्रुव जुरेल या यादीत सहभागी झाला आहे.

भारतीय संघाच्या 188 धावा असताना शुबमन गिल 50 धावा करून बाद झाला. त्यानंतर ध्रुव जुरेल मैदानात आला. केएल राहुल आणि त्याने 30 धावांची भागीदारी झाली. केएल राहुलचं शतक झालं आणि बाद झाला. त्यानंतर ध्रुव जुरेलने अष्टपैलू रवींद्र जडेजासोबत मोर्चा सांभाळला. या दोघांनी मिळून द्विशतकी भागीदारी केली. त्यामुळे वेस्ट इंडिचा संघ बॅकफूटवर गेला आहे. भारत पहिल्या डावात आरामात 350 च्या पार आघाडी घेऊ शकतो अशी स्थिती आहे. सामन्याचा दुसरा दिवस असल्याने मोठी आघाडी घेण्याची संधी आहे. जर भारताने मोठी आघाडी घेतली तर वेस्ट इंडिजला एका डावाने पराभूत करू शकतो.

ऋषभ पंत दुखापतग्रस्त असल्याने ध्रुव जुरेलच्या नावाचा विचार केला गेला. त्याने या संधीचं सोनं केलं आणि वेस्ट इंडिजविरुद्ध शतक ठोकलं. ध्रुव जुरेलने दाखवून दिलं की तो मोठी खेळी करण्यास सक्षम आहे. ध्रुव जुरेलचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे पहिलं शतक आहे. ध्रुव जुरेल 210 चेंडूत 15 चौकार आणि 3 षटकार मारत 125 धावांवर बाद झाला. त्याने 59.52 स्ट्राईक रेटने धावा केल्या.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.