AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेआधीच बी आणि सी संघांमध्ये मोठी उलथापालथ, दोन खेळाडूंची माघार; तर एकाचं कारण अस्पष्ट

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघातील दिग्गज खेळाडू दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. 5 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा असणार आहे. पण या स्पर्धेआधीच दिग्गज खेळाडूंनी माघार घेतली आहे. दोन खेळाडूंची बीसीसीआयने कारण सांगितलं आहे. तर एका खेळाडूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेआधीच बी आणि सी संघांमध्ये मोठी उलथापालथ, दोन खेळाडूंची माघार; तर एकाचं कारण अस्पष्ट
| Updated on: Aug 27, 2024 | 3:15 PM
Share

दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेसाठी चार संघ सज्ज झाले आहेत. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी इंडिया ए, इंडिया बी, इंडिया सी आणि इंडिया डी अशी वर्गवारी केली आहे. इंडिया ए संघाची जबाबदारी शुबमन गिलकडे, इंडिया बी संघाची जबाबदारी अभिमन्यू ईश्वरनकडे, इंडिया सी संघाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे, तर इंडिया डी संघाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे आहे. अभिमन्यू ईश्वरनच्या संघाला धक्का बसला आहे. कारण त्याच्या संघातून दोन दिग्गज खेळाडू बाहेर पडले आहेत. एकाचं कारण स्पष्ट आहे, तर एकाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. ऋतुराज गायकवाडच्या संघालाही गोलंदाजीत फटका बसला आहे. स्पर्धेच्या दहा दिवस आधी माघार घेणाऱ्या खेळाडूंमध्ये मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि रवींद्र जडेजाचा समावेश आहे.

भारतीय क्रिकेट बोर्डाने माहिती देताना सांगितलं की, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक आजारी आहेत. त्याच्यामुळे या दोघांना सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या दुलीप ट्रॉफीतून रिलीज केलं आहे. त्यांच्या जागी वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि पुडुचेरीचा वेगवान गोलंदाज गौरव यादव यांना सहभागी केलं आहे. गौरव मध्य प्रदेशमधून खेळला आहे. मागच्या पर्वात रणजी ट्रॉफीत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला होता. दुसरीकडे, अष्टपैलू रवींद्र जडेजा यालाही रिलीज केलं आहे. पण त्याचं कारण काही सांगितलेलं नाही. तसेच रवींद्र जडेजाच्या जागी बदली खेळाडूही दिलेला नाही.

रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज हे इंडिया बी संघातून खेळणार होते. या संघाचं नेतृत्व अभिमन्यू ईश्वरन याच्याकडे आहे. त्यामुळे संघातून दोन दिग्गज खेळाडू गेल्याने आता ईश्वरनची प्लेइंग 11 निवडताना कसोटी लागणार आहे. दुसरीकडे, इंडिया सी मधून उमरान मलिक बाहेर गेला आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाडला काही अंशी फटका बसला आहे. गौरव यादव त्याची उणीव भरून काढतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इंडिया बी: अभिमन्यु ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वाशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चाहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी , एन जगदीसन (विकेटकीपर)

इंडिया सी: ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीत, ऋतिक शौकीन, मानव सुथार, गौरव यादव, विशाक विजयकुमार, अंशुल खंबोज, हिमांशु चौहान, मयंक मारकंडे, आर्यन जुयाल (विकेटकीपर), संदीप वारियर.

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....