AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashes Series 2023 | ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, हा स्टार खेळाडू मालिकेतून ‘आऊट’!

England vs Australia 2nd Test | वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमला मोठा झटका लागला आहे. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू दुखापतीच्या कचाट्यात सापडला आहे.

Ashes Series 2023 | ऑस्ट्रेलियाला मोठा झटका,  हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आऊट'!
| Updated on: Jul 01, 2023 | 2:22 AM
Share

लॉर्ड्स | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 416 धावावंर ऑलआऊट केलं. इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 416 धावांना प्रत्युत्तर देताना जोरदार सुरुवात केली. मात्र इंग्लंडच्या पहिल्या डावातील फलंदाजीदरम्यान ऑस्ट्रेलियाला मोठा झटका लागला. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज नाथन लायन याला दुखापत झाली. नाथनला दुखापतीमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला. नाथनला चालण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. नाथनच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलंय.

नाथन लायन ऑस्ट्रेलियाचा प्रमुख आणि अनुभवी गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाला इंग्लंड विरुद्ध या प्रतिष्ठेच्या अ‍ॅशेस मालिकेत आणखी 3 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे नाथनला झालेली दुखापत गंभीर स्वरुपाची नसावी, अशीच प्रार्थना ऑस्ट्रेलिया क्रिकेट चाहते करत आहेत. मात्र ज्या प्रकारे नाथन मैदानात वेदनेमुळे विव्हळत होता, त्या हिशोबाने दुखापत गंभीर असू शकते. नाथन दुखापतीमुळे बाहेर झाला, तर ऑस्ट्रेलियासाठी तगडा झटका बसेल. त्यामुळे नाथनच्या दुखापतीबाबत पुढील अपडेट काय येते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

इंग्लंडची पहिल्या डावातील बॅटिंग

इंग्लंडने पहिल्या डावात ऑलआऊट 325 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 416 धावा केल्या. अशाप्रकारे पहिल्या डावात 91 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावातील 91 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावातील बॅटिंगला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत 2 विकेट्स गमावून 130 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे 221 धावांची मोठी आणि निर्णायक आघाडी आहे. आता ऑस्ट्रेलिया चौथ्या दिवशी कशाप्रकारे रणनिती आखून इंग्लंडसमोर विजयासाठी किती धावांचं आव्हान ठेवते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवूड.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), बेन डकेट, झॅक क्रॉली, ओली पॉप, जो रुट, हॅरी ब्रूक, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), स्टुअर्ट बॉर्ड, ऑली रॉबिन्सन, जॉश टंग आणि जेम्स एंडरसन.

छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.