AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravindra Jadeja चं सलग चौथं अर्धशतक, लॉर्ड्स टेस्ट रंगतदार स्थितीत, विजयासाठी 30 धावांची गरज, टीम इंडिया जिंकणार?

Ravindra Jadeja ENG vs IND 3rd Test Lords : ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने चिवट आणि झुंजार अर्धशतक ठोकलंय.जडेजाचं हे सलग चौथं अर्धशतक ठरलंय.

Ravindra Jadeja चं सलग चौथं अर्धशतक, लॉर्ड्स टेस्ट रंगतदार स्थितीत, विजयासाठी 30 धावांची गरज, टीम इंडिया जिंकणार?
Ravindra Jadeja Team IndiaImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Jul 14, 2025 | 9:41 PM
Share

रवींद्र जडेजा याने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी टी ब्रेकपर्यंत नॉट आऊट 56 रन्स करत टीम इंडियाला 9 विकेट्स गमावून 163 धावांपर्यंत पोहोचवलं आहे. टी ब्रेकपर्यंत मोहम्मद सिराज 2 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडने टीम इंडियासमोर 193 धावांचं आव्हान ठेवलं आहे. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रात विजयासाठी आणखी 30 धावांची आणखी गरज आहे. त्यामुळे तिसरा सामना कोण जिंकणार? याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे.

केएल राहुल याचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी 193 धावांचा पाठलाग करताना निराशा केली. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली.  यशस्वी जैस्वाल, करुण नायर, शुबमन गिल, ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर या 5 युवा आणि अनुभवी फलंदाजांनी निराशा केली.  वॉशिंग्टन सुंदर आऊट झाल्याने भारताची स्थिती 7 आऊट 82 अशी झाली. त्यानंतर जडेजाने शेपटीच्या फलंदाजांसोबत निर्णायक भागीदारी करत टीम इंडियाला सामन्यात कायम ठेवलं. सुंदर आऊट देण्यासाठी जडेजाची साथ देण्यासाठी नितीश कुमार रेड्डी मैदानात आला.

जडेजा आणि नितीश या दोघांनी आठव्या विकेटसाठी 30 धावा जोडल्या. नितीश कुमार 13 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर बुमराहनेही जडेजाला चांगली साथ दिली. मात्र बुमराह मोठा फटका मारण्याच्या मोहात कॅच आऊट झाला. बुमराहने 54 चेंडूत झुंजार 5 धावा केल्या.

बुमराह आऊट झाल्याने टीम इंडियाचा स्कोअर 9 आऊट 147 असा झाला. मोहम्मद सिराज मैदानात आला. सिराजनेही जडेजाला चांगली साथ दिली. जडेजाने या दरम्यान 68 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर चौकार ठोकत इंग्लंड विरूद्धच्या या मालिकेतील सलग चौथं तर कारकीर्दीतील 26 वं अर्धशतक ठोकलं. जडेजाने 150 चेंडूत 35.33 च्या स्ट्राईक रेटने झुंजार आणि चिवट अर्धशतक पूर्ण केलं. जडेजाने या दरम्यान 4 चौकार आणि 1 षटकार लगावला.

जडेजाची झुंजार अर्धशतकी खेळी

शेवटच्या सत्रात 30 धावांची गरज, कोण जिंकणार?

तसेच टीम इंडियाने टी ब्रेकपर्यंत 70 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 163 धावा केल्या आहेत. जडेजा 162 चेंडूत 56 धावांवर नाबाद परतला आहे. त्यामुळे आता टीम इंडिया शेवटच्या सत्रात 30 धावा करत मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेणार का? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.