ENG vs IND : दुसऱ्या टेस्टसाठी मॅचविनर बॉलरचा समावेश, खेळडूचं 4 वर्षानंतर कमबॅक

England vs India : इंग्लंड क्रिकेट टीम एडबस्टन बर्मिंघममध्ये बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात टीम इंडिया विरुद्ध कसोटी मालिकेतील दुसरा सामना 2 जुलैपासून खेळणार आहे. त्याआधी इंग्लंडने 26 जून रोजी दुसऱ्या सामन्यासाठी 15 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत.

ENG vs IND : दुसऱ्या टेस्टसाठी मॅचविनर बॉलरचा समावेश, खेळडूचं 4 वर्षानंतर कमबॅक
edgbaston
Image Credit source: @Edgbaston
| Updated on: Jun 26, 2025 | 7:34 PM

इंग्लंड क्रिकेट टीमने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीत धमाकेदार सुरुवात केली. इंग्लंडने मायदेशात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सलामी दिली. इंग्लंडने टीम इंडियावर 5 विकेट्सने मात करत 1-0 अशी आघाडी घेतली. भारतीय संघाचा आता दुसऱ्या कसोटी सामन्यातून विजय मिळवून कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे.त्यासाठी टीम इंडिया पहिल्या सामन्यात केलेल्या चुका टाळण्याच्या प्रयत्नात आहे. तर इंग्लंडने दुसऱ्या टेस्टसाठी चक्क 6 दिवसांआधीच 15 सदस्यीय संघ जाहीर करत आपण सज्ज असल्याचं जाहीर केलं आहे.

इंग्लंडने पहिल्या सामन्याच्या तुलनेत दुसऱ्या सामन्यासाठी आणखी एकाचा समावेश केला आहे.  हा एकमेव खेळाडू मॅचविनर आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचं इंग्लंड संघात कमबॅक झालं आहे. जोफ्राचं यासह एकूण 4 वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन झालं आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा सामना हा 2 ते 6 जुलै दरम्यान बर्मिंघममधील एजबेस्टमध्ये होणार आहे.

टीम इंडिया विरूद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांमध्ये अनुभवाचा अभाव स्पष्टपणे पाहायला मिळाला. टीम इंडियाच्या टॉप फलंदाजांनी याचा फायदा घेत शतकी खेळी केली.  मात्र आता जोफ्रा आर्चर परतल्याने इंग्लंडला आणि पर्यायाने अन्य गोलंदाजांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच जोफ्राच्या कमबॅकमुळे इंग्लंडची सलग दुसऱ्या विजयाची शक्यता आणखी वाढली आहे.

4 वर्षांनंतर कमबॅक टेस्ट टीममध्ये कमबॅक

दरम्यान जोफ्रा आर्चर याचं इंग्लंड कसोटी संघात तब्बल 4 वर्षांपेक्षा अधिक काळानंतर कमबॅक झालं आहे. जोफ्राने अखेरचा कसोटी सामना हा 24 फेब्रुवारी 2021 रोजी भारताविरुद्ध खेळला होता. त्यानंतर जोफ्राच्या अडचणीत वाढ झाली. जोफ्राला त्या सामन्यानंतर दुखापत झाली. त्यानंतर जोफ्राला विविध दुखापतींनी ग्रासल. त्यामुळे जोफ्राला नाईलाजाने कसोटी क्रिकेटपासून दूर रहावं लागलं.

जोफ्रा इज बॅक

जोफ्रा आर्चर याची कसोटी क्रिकेटमधील आकडेवारी

दरम्यान जोफ्रा आर्चर याने 14 ऑगस्ट 2019 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी पदार्पण केलं. जोफ्राने तेव्हापासून 2021 पर्यंत इंग्लंड टीमचं 13 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. जोफ्राने 24 डावांमध्ये 31.05 च्या सरासरीने 42 विकेट्स घेतल्या आहेत. जोफ्राने या दरम्यान एकूण 3 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे इंग्लंड टीम मॅनेजमेंट आर्चरचा टॉप 15 मधून प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करणार की नाही? याकडे भारतीय चाहत्यांचंही लक्ष असणार आहे.