AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs SA : स्पिनर केशव महाराज दुखापतीमुळे टी 20I सीरिजमधून बाहेर, दक्षिण आफ्रिकेला झटका

England vs South Africa T20i Series : दक्षिण आफ्रिकेसाठी टी 20i क्रिकेटमध्ये 38 विकेट्स घेणाऱ्या केशव महाराज याला दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे.

ENG vs SA : स्पिनर केशव महाराज दुखापतीमुळे टी 20I सीरिजमधून बाहेर, दक्षिण आफ्रिकेला झटका
South Africa Keshav Maharaj vs IndiaImage Credit source: Bcci
| Updated on: Sep 12, 2025 | 11:20 PM
Share

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिकेनंतर 3 सामन्यांची टी 20I सीरिज खेळवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेने बुधवारी 10 सप्टेंबरला इंग्लंडवर डीएलएसनुसार 14 धावांनी मात करत विजयी सलामी दिली. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. उभयसंघातील दुसरा सामना हा मँचेस्टरमध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला आज 12 सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका लागला आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्टार बॉलर दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर झाला आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाकडून सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा स्टार स्पिनर हनुमानभक्त केशव महाराज याला दुखापतीमुळे इंग्लंड विरूद्धच्या उर्वरित मालिकेतून बाहेर व्हावं लागलंय. केशवला डाव्या मांडीला त्रास जाणवत असल्याने त्याला मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. केशवच्या जागी बदली खेळाडूच्या नावाची घोषणाही क्रिकेट बोर्डाकडून करण्यात आली आहे. केशवच्या जागी ब्योर्न फोर्टुइन याला संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ब्योर्न फोर्टुइन याचा दुसर्‍या टी 20i सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

ब्योर्न फोर्टुइन याची कारकीर्द

ब्योर्न फोर्टुइन याने दक्षिण आफ्रिकेचं 13 एकदिवसीय आणि 25 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. ब्योर्नने 18 सप्टेंबर 2019 रोजी टीम इंडिया विरुद्ध टी 20i पदार्पण केलं होतं. तेव्हापासून ब्योर्नने 25 सामन्यांमध्ये एकूण 20 विकेट्स मिळवल्या आहेत. तर ब्योर्नने 13 एकदिवसीय सामन्यांमध्ये 16 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.

तसेच केशवच्या दुखापतीमुळे ब्योर्नचं जवळपास वर्षभरानंतर कमबॅक झालं आहे. ब्योर्नने आयर्लंड विरुद्ध 29 सप्टेंबर 2024 रोजी अखेरचा टी 20i सामना खेळला होता. त्यामुळे आता ब्योर्न मिळालेल्या संधीचा कसा फायदा घेतो, याकडे टीम मॅनजमेंटचं लक्ष असणार आहे.

केशव महाराज टी 20i मालिकेतून आऊट

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्करम (कॅप्टन), रायन रिकेल्टन (विकेटकीपर), लुआन-ड्रे प्रिटोरियस, डेवाल्ड ब्रेव्हिस, ट्रिस्टन स्टब्स, डोनोव्हन फरेरा, मार्को जॅन्सेन, कगिसो रबाडा, ब्योर्न फोर्टुइन, क्वेना मफाका आणि लिझाड विल्यम्स.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : फिलिप साल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), जेकब बेथेल, हॅरी ब्रूक (कर्णधार), टॉम बॅंटन, विल जॅक्स, सॅम करन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि ल्यूक वूड.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.