AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs SL: श्रीलंकेची तिसऱ्या दिवशी झुंजार खेळी, इंग्लंड विरुद्ध 82 धावांची आघाडी

England vs Sri Lanka 1st Test Day 3 Highlights: पिछाडीवर पडलेल्या श्रीलंकेने जोरदार कमबॅक करत इंग्लंड विरुद्ध 82 धावांची आघाडी घेतली आहे. जाणून घ्या तिसर्‍या दिवशी काय काय झालं?

ENG vs SL: श्रीलंकेची तिसऱ्या दिवशी झुंजार खेळी, इंग्लंड विरुद्ध 82 धावांची आघाडी
Kamindu Mendis and dinesh Chandimal
| Updated on: Aug 24, 2024 | 1:18 AM
Share

श्रीलंका क्रिकेट टीम इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना हा एमीरेट्स ओल्ड ट्रॅफॉर्ड, मॅनचेस्टर येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. श्रीलंकेने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात 6 विकेट्स गमावून 204 धावा केल्या आहेत. श्रीलंकेने यासह 82 धावांची आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने पहिल्या डावात ऑलआऊट 236 धावा केल्या. इंग्लंडने त्या प्रत्युत्तरात 358 धावा केल्या. इंग्लंडने यासह 122 धावांची आघाडी घेतली. श्रीलंकेने इंग्लंडला दुसऱ्या डावात जोरदार प्रत्युत्तर देत आतापर्यंत 82 धावांची आघाडी मिळवण्यात यश मिळवलं आहे. आता चौथ्या दिवसाच्या खेळाकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ

श्रीलंकेने पहिल्या डावात केलेल्या 236 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंड दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 61 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 259 धावा केल्या. इंग्लंडने 23 धावांची आघाडी मिळवली. मात्र इंग्लंडला तिसऱ्या दिवशी 4 विकेट्सच्या मोबदल्यात 99 धावाच करता आल्या. इंग्लंडचा पहिला डाव हा 358 धावांवर आटोपला. इंग्लंडला 122 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडसाठी जेमी स्मिथ याने सर्वाधिक 111 धावांची खेळी केली. तर श्रीलंकेकडून असिथा फर्नांडो याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

श्रीलंकेचा दुसरा डाव

श्रीलंकेने दुसऱ्या डावात चिवट खेळी करत इंग्लंडची आघाडी मोडीत काढत लीड घेतली. इंग्लंडने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 60 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 204 धावा केल्या. श्रीलंकेकडे 82 धावांची आघाडी आहे. दिनेश चांदिमल 20 तर कुसल मेंडीस 56 धावा करुन नाबाद परतले. त्याआधी अँजलो मॅथ्यूज याने सर्वाधिक 65 धावांची खेळी केली. दिमथु करुणारत्नेने 27 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन धनंजया डी सिल्वा आणि मिलन रथनायके या दोघांनी 11 आणि 10 अशा धावा केल्या. तर निशान मदुशंका आणि कुसल मेंडीस या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. इंग्लंडसाठी ख्रिस वोक्सने 2 विकेट्स घेतल्या. तर गस ऍटकिन्सन, मार्क वूड, मॅथ्यू पॉट्स आणि जो रुट या चौघांनी 1-1 विकेट घेतली.

सामना रंगतदार स्थितीत

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मॅथ्यू पॉट्स, मार्क वुड आणि शोएब बशीर.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, विश्व फर्नांडो आणि मिलन रथनायके.

Follow Us
एकच खळबळ! गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट, हे नेमकं...
एकच खळबळ! गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट, हे नेमकं....
लवकर आटपा बोलणं झोंबलं... भुजबळ- तटकरेंची सुनेत्रा वहिनींसमोरच जुंपली
लवकर आटपा बोलणं झोंबलं... भुजबळ- तटकरेंची सुनेत्रा वहिनींसमोरच जुंपली.
ठाणे ते रायगड….विधान परिषदेसाठी शिंदे गटात या नावांची जोरदार चर्चा
ठाणे ते रायगड….विधान परिषदेसाठी शिंदे गटात या नावांची जोरदार चर्चा.
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ...
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ....
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक...
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक....
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना...
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना....
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल.
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त....
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त.....
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला..
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला...
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत.